Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Congress News : काँग्रेसच्या दिग्गजांची पाठ; विराट सभांना फाटा

Congress News : काँग्रेसने उत्तर गोव्यातून ॲड. रमाकांत खलप आणि दक्षिणेतून कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची उमेदवारी फार उशिराने जाहीर केली. त्यानंतर प्रचाराने जोर धरायला हवा तसे झालेले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Congress News :

पणजी, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांसाठी राज्यात जाहीर सभेचे आयोजन होणार आहे का? राहुल गांधी किंवा प्रियांका वाड्रा यांच्या सभा होणार आहेत का? या प्रश्नांचे उत्तर प्रदेश पातळीवर नाही.

एका बाजूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सांकवाळ येथे भाजपने आयोजित केली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा ३ रोजी म्‍हापसा येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रचारातील विस्कळीतपणा चटकन नजरेस भरणारा आहे. त्यातच काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा संशय काही नेत्यांकडूनच खासगीत व्यक्त केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काँग्रेसने उत्तर गोव्यातून ॲड. रमाकांत खलप आणि दक्षिणेतून कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची उमेदवारी फार उशिराने जाहीर केली. त्यानंतर प्रचाराने जोर धरायला हवा तसे झालेले नाही. याउलट भाजपने आमदारांचे स्वतंत्र दौरे, उमेदवारांचे स्वतंत्र दौरे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या स्वतंत्र बैठका असा एकाचवेळी विविध पातळीवर, विविध ठिकाणी प्रचार सुरू ठेवला आहे.

निरीक्षणे अशी...

१खलप हे अनेक ठिकाणी अद्याप पोचलेलेच नाहीत. त्यांना काँग्रेसचा मतदार कुठे आहे हे समजलेले नाही. ते जात असलेला बहुतांश भाग हा भाजप मतदारांचा आहे असे दिसून येते. त्यामुळे त्यांनी तेथे कितीही प्रचार केला तरी त्याचा राजकीय लाभ त्यांना होणार नाही हे त्यांना समजलेले नाही.

२ पणजी बाजारात त्यांनी फेरी मारली; पण पणजीतील पारंपरिक काँग्रेस मतदारापर्यंत ते पोचलेले नाहीत. दक्षिणेत विरियातो हेही अल्पसंख्याकबहुल भागात फिरताना दिसतात. भाजपची मते असलेल्या भागात त्यांचे दौरे अद्याप व्हायचे आहेत.

३ सासष्टीत मताधिक्य त्यांना मिळेल हे ठरून गेलेले असताना मुरगाव, केपे, सांगे, काणकोण तालुक्यातून मते मिळवण्यासाठी खास प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसत नाहीत. ते असतात तेथेच प्रचार सुरू असतो उर्वरित मतदारसंघात सामसूम असे चित्र सध्या दिसते.

प्रचारात जोश नाही!

काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचे स्वरूप केवळ मतदारांशी जाता जाता साधलेला संवाद किंवा हस्तांदोलन यापुरताच मर्यादित राहिलेला आहे. काही ठिकाणी छोट्या बैठकांचे आयोजन करण्यात येते.

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे सारे पक्ष एकत्र आल्याचे कागदोपत्री चित्र दिसत असले, तरी तो जोश प्रत्यक्षात प्रचारादरम्यान दिसत नाही.

नेते पोटतिडकीने विषय मांडताना दिसतात; पण तो विचार मतदारांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यकर्तेच नाहीत असे चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: संततधार पावसामुळे सोनाळचा रस्ता पाण्याखाली

Surla Project: 'सुर्ला प्रकल्प रद्द करा, पर्यावरण वाचवा'! ग्रामस्‍थ व पर्यावरणप्रेमींची PM मोदी, CM सावंतांकडे आग्रही मागणी

Vishwajit Rane: गोव्यात एका वर्षात 5 लाख झाडे लावणार, मंत्री राणेंची ग्वाही

Goa Eco Sensitive Zone: गोवा सरकारला मोठा धक्का! जैवसंवेदनशील 22 गावे वगळण्याच्या प्रयत्नांना खो; केंद्राला हवी आणखी माहिती

Comunidade Land: बेकायदा बांधकामांचे रक्षण नको, कोमुनिदादी जाणार सुप्रीम कोर्टात; चिंचोणेत 67 प्रमुखांचा निर्णय

SCROLL FOR NEXT