Pallavi Dhempe Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024 : नाव जाहीर होताच महिला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह! पल्लवी धेंपेंना जिंकून आणणारच

Loksabha Election 2024 : अखेर नाव जाहीर झाले आणि भाजप कार्यालयात महिला कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहू लागला.

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024 :

पणजी, काही क्षणात नाव जाहीर होणार, असा संदेश भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर आला. तेव्हापासून कार्यकर्त्यांची उत्‍सुकता शिगेला ताणली. पल्लवी धेंपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, असा अंदाज होताच.

कारण हे नाव दिल्लीतून जाहीर होणार होते. अखेर नाव जाहीर झाले आणि भाजप कार्यालयात महिला कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहू लागला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली आणि पत्रकारांसह कार्यकर्ते भाजपच्या कार्यालयात धडकले. तोपर्यंत पल्लवी यांचे नाव ‘फायनल’ झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, आमदार डॉ. दिव्या राणे, स्नेहा भागवत यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ‘मोदी है तो मुमकिन है’ हा नाराही गाजला.

लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात दक्षिण गोव्यातून महिला उमेदवार म्हणून भाजपने पहिल्यांदाच एखाद्या महिलेला संधी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला सबलीकरणाचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सुलक्षणा सावंत यांनी सांगितले.

‘त्या’ सर्व महिला पल्लवींच्‍या पाठीशी

विविध माध्यमांवर महिला उमेदवारीची चर्चा रंगत होती. रोज नव्या चेहऱ्यांची नावे प्रसिद्ध केली जात होती. मात्र नाव कुणाचे असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. आज पल्लवी धेंपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

माध्यमांमध्ये ज्या-ज्या महिलांची नावे चर्चेत होती, त्या सर्व पल्लवी धेंपे यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. आम्ही त्यांना मोठ्या मताधिक्क्याने जिंकून आणणार हे निश्चित. महिला उमेदवार कोण असेल, याची विरोधकांनाही उत्सुकता होती, असेही मुख्यमंत्री म्‍हणाले.

महिला उमेदवारीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. त्‍यामुळे सर्वांची उत्‍सुकता ताणली होती. भाजपच्या महिला मोर्चाने राज्यात विविध क्षेत्रात कामे केलेली आहेत. पल्लवी धेंपे यांचेही त्यात मोठे योगदान आहे. मात्र त्यांचे कार्य पडद्यामागे होते. त्यांना आता खासदार होण्‍याची संधी मिळाली आहे. त्‍यामुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. भाजपमध्येच हे शक्य आहे.

- सुलक्षणा सावंत, भाजप नेत्‍या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

SCROLL FOR NEXT