South Goa Congress Candidate Viriato Fernandes
South Goa Congress Candidate Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024: काँग्रेस उमेदवार विरियातो यांच्या समर्थक महिलेने पैसे वाटल्याची तक्रार

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री (६ मे २०२४ रोजी) काँग्रेस उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांची वाडे येथील एक समर्थक महिला दाबोळी-नवेवाडेतील जय संतोषी माता मंदिराच्या बाजूस असलेल्या चाळीत पैसे वाटप करण्यासाठी आली होती.

काँग्रेस उमेदवाराची समर्थक महिला नवेवाडे चाळीत पैसे वाटप करीत असल्याचे दाबोळी भाजप मंडळाला समजताच त्यांनी मुरगाव निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार केली. भरारी पथकाने त्वरित नवेवाडेतील चाळीत येऊन त्या कॉंग्रेसच्या महिला समर्थक व त्यांच्या एका साथीदारांची झडती घेतली. नंतर काँग्रेसच्या त्या दोघाही कार्यकर्त्यांना पोलिस स्थानकावर आणून त्यांच्याविरोधात भरारी पथकाने रितसर तक्रार दाखल केली.

काँग्रेस समर्थक महिलेने दाबोळी भाजप मंडळाचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत पैसे वाटप करीत असल्याची चुकीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. खरे तर तीच महिला आपल्या एका कार्यकर्त्यासमवेत चाळीत पैसे वाटप करण्यासाठी आली होती, अशी तक्रार पोलिस स्थानकांत नोंद असल्याची माहिती दाबोळी भाजप मंडळाचे युवा नेते सचिन चौगुले यांनी दिली आहे.

काँग्रेस (Congress) पक्षाला आपला पराभव नजरेसमोर दिसत असल्यानेच दाबोळी भाजप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप ती महिला व त्यांचे पदाधिकारी करीत असल्याचा दावा दाबोळी भाजप गटाने केला आहे. दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांचा विजय निश्चित असल्यानेच काँग्रेस भाजपवर आरोप करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Monsoon 2024: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

SCROLL FOR NEXT