Mandrem  Dainik Gomantak
गोवा

Mandrem News : मांद्रेतून भाजपला मिळवून देणार १५ हजारांचे मताधिक्‍य : आमदार दयानंद सोपटे

Mandrem News : आमदार जीत आरोलकर यांनीही आपली जबाबदारी ओळखावी

गोमन्तक डिजिटल टीम

Mandrem News :

पेडणे, लोकसभा निवडणुकीसाठी मांद्रे मतदारसंघात भाजप गट समिती, महिला मोर्चा, युवा मोर्चा, अल्पसंख्याक समित्या, बूथ समित्या संघटितपणे काम करत आहेत. त्‍यामुळे भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना पंधरा हजारांपेक्षा जास्त जास्‍त मताधिक्‍य मिळेल.

मगो हा सरकारमधीलच एक घटक पक्ष आहे. त्‍यामुळे त्‍या पक्षाचे विद्यमान आमदार जीत आरोलकर यांचीही भाजपला मताधिक्य मिळवून देणे ही मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन माजी आमदार दयानंद सोपटे यांनी केले.

मांद्रे येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोपटे बोलत होते. यावेळी मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष मधू परब, सरचिटणीस सुनील परब, रवींद्र गोवेकर, मंडळ सचिव प्रदीप नाईक व प्रदेश कार्यकारीणी सदस्य अनंत गडेकर उपस्थित होते.

केंद्र व राज्‍य सरकारच्‍या सहकार्याने राज्‍यात अनेक उद्योग, प्रकल्‍प आले असून हजारो लोकांना रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध झाल्‍या आहेत. कित्‍येक विकासाभिमुख कामे मार्गी लागली आहेत. ही विकासाची गंगा अशीच वाहत राहण्‍यासाठी नरेंद्र मोदी हे पुन्‍हा पंतप्रधानपदी विराजमान होणे गरजेचे आहे. त्‍यामुळे उत्तर गोव्‍यातील भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना निवडून आणणे आमची सर्वांची जबाबदारी ठरते, असे सोपटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चिनी जहाजावर हल्ल्याची तयारी अन् शेवटच्या मिनिटाला ट्विस्ट! AI वरील भरोसा ठरला असता तिसऱ्या महायुद्धाचं कारण; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Ravi Naik Legacy: 'वडिलांचा विकासाचा वारसा पुढे नेऊ'; रवी नाईकांच्या जयंतीनिमित्त फोंड्यात मोठी गर्दी, रितेश-रॉय नाईकांनी व्यक्त केला निर्धार

Goa Weather: घाटमाथा चिंब भिजला, पणजीसह किनारपट्टी कोरडीच; गोव्यात पावसाची तूट 31.6 टक्क्यांवर, शेती-बागायतींची चिंता वाढली

Goa Medical College: गोमेकॉत रुग्णांच्या जेवणात मोठा बदल; स्टील प्लेटऐवजी आता 'कॅम्ब्रो प्लेट', स्वच्छता आणि पोषणावर विशेष भर

Crime News: दया-याचनेची विनवणी ठरली निष्फळ! वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र दिसल्यानं जोडप्याला भयानक शिक्षा; शरिया नियमांचं उल्लंघन ठरलं जीवघेणं

SCROLL FOR NEXT