Goa Loksabha Candidate Asset: खलपांकडे 6.22 कोटींची संपत्ती; पत्‍नीकडे 11 कोटी 54 लाखांची मालमत्ता

Goa Loksabha Candidate Asset: ४ कोटी ९० लाख रुपये एवढी या भूखंडांची आजची किंमत आहे. त्यांच्याकडे म्हापशाच्या नातालीना अपार्टमेंटमध्ये कार्यालय आहे.
Goa Loksabha Candidate Asset
Goa Loksabha Candidate AssetDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Loksabha Candidate Asset

काँग्रेसचे उत्तर गोव्‍यातील उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी आपल्याकडे ६ कोटी २२ लाख ५४ हजार ४८३ रुपयांची तर पत्नी निर्मला खलप यांच्‍याकडे ११ कोटी ५४ लाख १९ हजार ६५० रुपयांची मालमत्ता असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहा गीते यांच्‍याकडे खलप यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, ‘आप’चे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा उपस्‍थित होते.

खलप यांच्याविरोधात कोणत्याही पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद नाही. कोणत्याही न्यायालयात खटला प्रलंबित नाही. तसेच कोणत्याही गुन्‍ह्यासाठी न्यायालयाकडून शिक्षा झालेली नाही. त्‍यांच्‍याकडे ४५ हजार रुपये रोख तर त्यांच्या

पत्नीकडे रक्कमच नाही. खलप यांच्याकडे २०५ मध्ये खरेदी केलेली आयटेन कार आहे. त्यांच्या पत्नीकडे वाहन नाही. मात्र निर्मला खलप यांच्याकडे ३ किलो ६६६ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. त्याची किंमत २ कोटी ४५ लाख ६३ हजार ५४० रुपये होते. रमाकांत खलप यांच्याकडे सोनेनाणे नाही.

चौकट

खलप यांचे पाच वर्षांतील उत्पन्न (रुपयांत)

२०१८-१९ : ३९ लाख ४२ हजार ४५०

२०१९-२० : ३३ लाख ८९ हजार ८८०

२०२०-२१ : १८ लाख ९२ हजार ३६०

२०२१-२२ : २१ लाख २६ हजार २९०

२०२२-२३ : २० लाख ४८ हजार ८१०

चौकट

निर्मला खलप यांचे पाच वर्षांतील उत्पन्न

२०१८-१९ : २८ लाख ७९ हजार ९२०

२०१९-२० : २२ लाख ४४ हजार ८८०

२०२०-२१ : ८ लाख २ हजार ३६०

२०२१-२२ : १० लाख ७३ हजार २९०

२०२२-२३ : ९ लाख ३७ हजार ११०

निर्मला खलप यांच्या बॅंक ठेवी

एचडीएफसी बॅंक (म्हापसा) : ३० हजार ४५३

आयसीआयसीआय बॅंक (म्हापसा) : ५७ हजार ६४८

एचडीएफसी बॅंक (मुदत ठेव) : ८ लाख ४९ हजार ८५६

आयसीआयसीआय बॅंक (मुदत ठेव) : ९ लाख २ हजार ६१७

पोस्‍टातील ठेवी : १५ हजार

निर्मला खलप यांचे शेअर्स (रुपयांत)

रिलायन्स पेट्रोलियम : २ हजार

रिलायन्स इक्विटी : ८ हजार

हॉटेल मयुरा : २ कोटी २८ लाख ३७ हजार ५३५

चौकट

अनेक ठिकाणी भूखंड

रमाकांत खलप यांच्याकडे म्हापशात ५ हजार १६१ चौरस मीटर भूखंड आहे. तो त्यांना वारसा हक्काने मिळाला आहे. त्याची बाजारातील किंमत आज १ कोटी २९ हजार २ हजार ५०० रुपये आहे. खलप यांच्याकडे आल्तिनो म्हापसा येथे ६०० चौरस मीटरचा भूखंड असून त्याची किंमत १८ लाख रुपये आहे. त्यांच्याकडे पणजीतील राणी प्रमिला आर्केड इमारतीत कार्यालय असून त्याची किंमत ४५ लाख रुपये आहे.

Goa Loksabha Candidate Asset
Goa BJP slams K'taka CM: 'स्वत:च्या राज्यातील समस्यांकडे लक्ष द्या', गोवा भाजपने सिद्धरामय्यांवर टीका का केली?

तसेच वारसाहक्काने मिळालेले म्हापसा येथे घर आहे. त्याची किंमत ३ कोटी ४७ लाख २ हजार ५०० रुपये आहे. तर, पत्नी निर्मला यांच्याकडे मोरजी, मांद्रे व मालवाड येथे मिळून ७ हजार ४०४ चौरस मीटर व ५ हजार ७७० चौरस मीटरचा आणि ३ एचआरएम आकाराचे भूखंड आहेत.

४ कोटी ९० लाख रुपये एवढी या भूखंडांची आजची किंमत आहे. त्यांच्याकडे म्हापशाच्या नातालीना अपार्टमेंटमध्ये कार्यालय आहे. त्याची किंमत १५ लाख रुपये आहे. शिवाय २१ लाख रुपये किमतीची सदनिका आहे.

ॲड. खलप यांच्या बॅंकेतील ठेवी

कॅनरा बॅंक (म्हापसा) : ५ लाख ६६ हजार ४९९

स्टेट बॅंक (दिल्ली) : २३ लाख ३३ हजार ९२६

स्टेट बॅंक (म्हापसा) : ५७ हजार ८८६

स्टेट बॅंक (दिल्ली) मुदत ठेव : ५४ लाख ६६ हजार ९५५

स्टेट बॅंक (गोवा) मुदत ठेव : १ लाख ९२ हजार ६२०

कॅनरा बॅंक (गोवा) मुदत ठेव : २३ लाख १९ हजार ८०३

शेअर्समध्‍ये गुंतवणूक (रुपयांत)

स्टेट बॅंके : १५ हजार ९००

म्हापसा अर्बन बॅंक : २५ हजार

बार्देश बझार : ४ हजार २०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com