Ravi Naik Legacy: 'वडिलांचा विकासाचा वारसा पुढे नेऊ'; रवी नाईकांच्या जयंतीनिमित्त फोंड्यात मोठी गर्दी, रितेश-रॉय नाईकांनी व्यक्त केला निर्धार

Ravi Naik Birth Anniversary Tribute: फोंड्यासह राज्याच्या समृद्ध विकासासाठी आमचे वडील रवी नाईक कार्यरत राहिले. त्यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली.
Ravi Naik Birth Anniversary Tribute
Ravi Naik LegacyDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंड्यासह राज्याच्या समृद्ध विकासासाठी आमचे वडील रवी नाईक कार्यरत राहिले. त्यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली. विकासकामांचे पर्व त्यांच्या आमदार ते मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरू झाले आणि गोव्याचा विकासात्मक चेहरा सर्वांसमोर आला. आज त्यांचाच हा विकासाचा वारसा आम्ही पुढे नेणार असून सर्वांच्या सहकार्याने हे काम केले जाईल, अशी ग्वाही रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक व रॉय नाईक यांनी दिली.

खडपाबांध - फोंडा येथील दिवंगत रवी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुण्यस्मरणावेळी रितेश नाईक व रॉय नाईक बोलत होते. रवी नाईक यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. फोंड्यासह राज्यातील विविध भागातून रवीप्रेमी तसेच त्यांचे समर्थक उपस्थित होते.

त्यात भारतीय जनता पक्षाचे मुख्य संघटक सतीश धोंड, अनिवासी भारतीय आयुक्त तथा माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष ॲड. मनोहर आडपईकर, नगरसेवक आनंद नाईक, रूपक देसाई, ज्योती नाईक व इतर नगरसेवक तसेच कुर्टी - खांडेपार सरपंच नावेद तहसीलदार इतर पंच सदस्य, भाजपचे मंडळ अध्यक्ष हरेश नाईक, ॲड. सतीश पिळगावकर, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Ravi Naik Birth Anniversary Tribute
Goa Weather: घाटमाथा चिंब भिजला, पणजीसह किनारपट्टी कोरडीच; गोव्यात पावसाची तूट 31.6 टक्क्यांवर, शेती-बागायतींची चिंता वाढली

रितेश नाईक म्हणाले की, आपले वडील रवी नाईक यांनी आमदार ते खासदार, मुख्यमंत्री अशी राजकारणाची चढती कमान सर केली. सहा दशके ते राजकारणात राहिले. फोंड्याचा कायापालट करताना मोठमोठी विकासकामे त्यांनी साकारली. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात तर त्यांनी धोरणात्मक निर्णय घेताना गोव्याला एक उच्च स्थान प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी ते कार्यरत राहिले.

कृषी धोरण त्यांच्याच कृषीमंत्रिपदाच्या कार्यकाळात आकाराला आले. गरीब श्रीमंत असा भेदभाव न करताना सर्व गोमंतकीयांना हक्क मिळावा, यासाठी कुळ मुंडकारांसाठी त्यांंनी लढा दिला. रॉय नाईक म्हणाले की, आमच्या वडिलांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्यरत राहताना विकासकामांवर भर दिला. त्यांचा हा आदर्श आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. यावेळी रवी नाईक यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

Ravi Naik Birth Anniversary Tribute
Goa Medical College: गोमेकॉत रुग्णांच्या जेवणात मोठा बदल; स्टील प्लेटऐवजी आता 'कॅम्ब्रो प्लेट', स्वच्छता आणि पोषणावर विशेष भर

रवी समर्थकांची गर्दी...!

चतुर्थीचा पाचवा दिवस असतानाही खडपाबांध येथील रवी नाईक यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी रवीप्रेमी व समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. त्यात राजकीय, सामाजिक, औद्योगिक तसेच कला संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता. रवी नाईक यांचे कुटुंबासह इतर नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन केले. सकाळी साडेनऊ ते दुपारी एकपर्यंत नागरिकांनी स्मृतीस्थळावर उपस्थिती लावली. माजी मुख्यमंत्री आणि आपले आवडते नेते रवी नाईक यांना त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी फोंड्यासह इतर भागातीलही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com