Goa Medical College: गोमेकॉत रुग्णांच्या जेवणात मोठा बदल; स्टील प्लेटऐवजी आता 'कॅम्ब्रो प्लेट', स्वच्छता आणि पोषणावर विशेष भर

GMC Cambro Plates for Patients: गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (गोमेकॉ) रुग्णांच्या उपचारासोबतच आता त्यांच्या आहार आणि पोषण व्यवस्थेत सुधारणा केल्या आहेत.
GMC Cambro Plates for Patients
Goa Medical CollegeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (गोमेकॉ) रुग्णांच्या उपचारासोबतच आता त्यांच्या आहार आणि पोषण व्यवस्थेत सुधारणा केल्या आहेत. रुग्णांना स्वच्छ, सुरक्षित आणि पोषक असा आहार उपलब्ध व्हावा यासाठी भोजन देण्याच्या व्यवस्थेत बदल केला आहे. आतापर्यंत त्यासाठी स्टिलच्या प्लेटचा वापर केला होता; परंतु आता बंदिस्त अशा ‘कॅम्‍ब्रो प्लेट’चा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

या प्लेट्समुळे आहाराची स्वच्छता राखणे सोपे होणार आहे. रुग्णांना अन्न अधिक सुरक्षित मिळणार आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गोमेकॉतमध्ये विविध सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. हा बदलही त्यांच्याच सूचनेनुसार करण्यात आला आहे. रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा उपलब्ध करताना दुपारच्या आहारात एक वाटी दह्याची असणार आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम व इतर पोषक घटक असतात. परिणामी रुग्णांच्या पोषकमूल्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.

GMC Cambro Plates for Patients
Goa Road Accident: अपघाताने उद्ध्वस्त केले लग्नाचे स्वप्न; केरये येथे कंटेनरला बुलेटची भीषण धडक, पंढरपूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू

याशिवाय ज्या रुग्णांना नियमित आहार घेणे शक्य नाही, अशा रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि त्यांचे अतिरिक्त पोषण गरजेचे असते, हे सर्व लक्षात घेऊन त्यांच्यासाठी प्रथिनयुक्त ‘न्यूट्रिशनल फीड्स'' उपलब्ध केले जात आहे. त्याशिवाय रुग्णांच्या वैद्यकीय गरजेनुसार त्यांच्या आहाराची आखणी केली जात आहे. ‘गोवा मॉडेल ऑफ हेल्थकेअर’ अधिक मजबूत करण्याच्या दिशेने गोमेकॉमध्ये केले जाणारे बदल महत्त्वाचे आहेत, असे राणे यांनी नमूद केले.रुग्णांच्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करताना आहारात लहानसे बदल केले असले तरी ते रुग्णांच्या दैनंदिन सेवेत स्वच्छता, सुविधा आणि पोषणाला प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

व्यवस्थेतील बदल

कॅम्ब्रो प्लेट : स्टीलच्या उघड्या प्लेटऐवजी झाकण असलेल्या बंदिस्त कॅम्ब्रो प्लेटमुळे अन्नाची स्वच्छता आणि सुरक्षितता वाढणार.

दह्याचा समावेश : सर्व रुग्णांच्या दुपारच्या आहारात प्रथिने आणि कॅल्शियमयुक्त एक वाटी दही.

न्यूट्रिशनल फीड्स : नियमित आहार घेऊ न शकणाऱ्या रुग्णांसाठी विशेष प्रथिनयुक्त फीड्स उपलब्ध.

GMC Cambro Plates for Patients
Goa Economy: गोव्याच्या अर्थकारणाचे दिल्लीत 'मंथन'; महसूलवाढ आणि खर्च नियंत्रणावर भर, सरकारने घेतले 100 कोटींचे कर्ज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com