Voting DainiK Gomantak
गोवा

Goa News: चला मतदानाला! सिंधुदुर्ग, कारवार आणि बेळगावचे मतदार गावाला रवाना

Goa News: बारा राज्यातील ९४ लोकसभा जागांसाठी उद्या (मंगळवारी, ०७ मे) मतदान होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News

लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या निमित्ताने उद्या मंगळवार दि. 07 मे रोजी सर्वांनाच सुट्टी असल्याने अनेकजण आज गावाला रवाना झाले. कदंब बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकांवर गावी जाणाऱ्यांची गर्दी दुपारपासून दिसून येत होती.

आपल्या दुचाकीवर शेजारील सिंधुदुर्ग, कारवार आणि बेळगाव जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी होती.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशापासून, मद्यविक्रीची दुकाने काल सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद आहेत. मतदानाच्या दिवशी म्हणजे उद्या मध्यरात्रीपर्यंत ती बंद राहतील.

सरकारने उद्या सरकारी, निमसरकारी, खासगी तसेच रोजंदारीवरील अशा सर्वच प्रकारचेकर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. निवडणूक कामात असलेल्यांना टपाल मतदानाची सोय करण्यात आली होती.

त्या कर्मचाऱ्यांनी आपले मतदान केले आहे. मतदान कामावरील कर्मचाऱ्यांना नंतर सुट्टी घेण्याची सुविधा देण्यात येणार आहे. चार जून रोजी मतमोजणीच्या दिवशीही मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना सुरक्षा बाळगण्याचा इशारा

Priya Yadav Case: 'प्रिया'चे Cash For Job कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत? ‘ते’ रेल्वे अधिकारी कोण? रोज नवीन भानगडी उघडकीस

Goa App: 8.43 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्याची संधी हुकली; गोव्याचा उद्योग अमेरिकेत Tim Draper च्या शोमध्ये झळकला पण...

IFFI 2024: चित्रपट कार्यशाळेत डॉ. इंद्रनीलनी सांगितली भारतीय चित्रपट मागे राहण्याची कारणे; म्हणाले की 'डिजिटल माध्यमांमुळे सिनेसृष्टीचे भविष्य..'

गोव्याला ‘रेड लाइट एरिया’ बनवू नका! एस्कॉर्ट सेवेवर कठोर कारवाईची सिल्वेरा यांची मागणी

SCROLL FOR NEXT