Om Birla Dainik Gomantak
गोवा

Om Birla Goa Visit: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला 'या' दिवशी येणार गोव्यात; निराधार नागरिकांना घरे प्रदान करणार

भाजप कार्यकर्त्यांना देणार कानमंत्र

दैनिक गोमन्तक डिजिटल

Loksabha Om Birla will visit Goa in next week: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे पुढील आठवड्यात गोव्यात येणार आहेत. त्यांच्या हस्ते निराधार नागरिकांना घरांचे वितरण करण्यात येणार आहे. गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, या निमित्ताने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांना ओम बिर्ला कानमंत्रही देण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपने गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. यापुर्वीच केंद्रीय गृह मंत्री अमित शाहांनी गोव्यात सभा घेऊन लोकसभेचा बिगुल फुंकला आहे. गत वेळी

सध्या उत्तर गोव्यात भाजपचे श्रीपाद नाईक खासदार आहेत. ते केंद्रीय मंत्री आहेत. तर दक्षिण गोव्यात काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन खासदार आहेत. गतवेळी सार्दिन यांनी नरेंद्र सावईकर यांना लोकसभा निवडणुकीत मात दिली होती. तथापि, यंदा भाजपने दक्षिण गोव्याची जागाही जिंकण्याची तयारी सुरू केली आहे.

15 जून रोजी ओम बिर्ला गोव्यात येत आहेत. काणकोण मतदारसंघात श्रमधाम संकल्पनेअंतर्गत बांधलेल्या 20 घरांचे निराधार नागरिकांना वितरण करण्यात येणार आहे. या संकल्पनेंतर्गत एक रूपया आणि एक दिवस श्रम असे आवाहन करण्यात आले होते.

गोव्यासह राज्याबाहेरूनही या उपक्रमाला मदत मिळाली. बलराम चॅरिटेबल फाऊंडेशन ट्रस्टच्यावतीने काणकोण मतदारसंघातील निराधार नागरिकांना यापुर्वीच दोन घरे प्रदान करण्यात आली आहेत.

दरम्यान, ज्या 20 नागरिकांना ही घरे देण्यात येणार आहेत, त्यांच्या जीवनावर आधारित पुसत्काचे प्रकाशनही यावेळी होणार आहे. 15 जून रोजी शेळेर येथील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Traffic Police: 'बेशिस्त' वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका! वर्षभरात 94 लाखांहून अधिक दंड वसूल; 5,025 जणांवर कारवाई

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

SCROLL FOR NEXT