Om Birla Goa Visit Dainik Gomantak
गोवा

Om Birla Goa Visit: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला 'या' दिवशी गोव्यात; आमदारांना संबोधित करणार

सभापती तवडकर यांनी दिली माहिती; काणकोणमध्ये निराधारांना घरांचे वाटप करणार

गोमंतक ऑनलाईन टीम

Om Birla Goa Visit: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे १५ जून रोजी गोव्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. या वेळी बिर्ला हे राज्यातील आमदारांना संबोधित करणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते काणकोण येथे निराधारांना घरांचे वितरण करण्यात येणार आहे.

गोवा विधानसभेचे सभापती आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, काणकोण मतदारसंघात श्रमधाम संकल्पनेअंतर्गत बांधलेल्या 20 घरांचे निराधार नागरिकांना वितरणही यावेळी बिर्ला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या संकल्पनेंतर्गत एक रूपया आणि एक दिवस श्रम असे आवाहन केले होते.

राज्याबाहेरूनही या उपक्रमाला मदत मिळाली. निराधार नागरिकांना यापुर्वीच दोन घरे प्रदान केली आहेत.

दरम्यान, ज्या 20 नागरिकांना ही घरे देण्यात येणार आहेत, त्यांच्या जीवनावर आधारित श्रमधाम नावाच्या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी होणार आहे. शेळेर येथील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT