Goa Legislative Assembly Dainik Gomantak
गोवा

Goa Legislative Assembly Session 2023: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोव्याबद्दल व्यक्त केलाय विश्वास; म्हणाले, 'जगातील एक प्रसिद्ध...'

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला: मंत्री, आमदारांना केले मार्गदर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa LegisGoa Legislative Assembly Session 2023: गोव्यात सुरू असलेल्या विविध क्षेत्रामधील प्रगती आणि साधनसुविधांचा विकास पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०४७ पर्यंतचे विकसित भारताचे स्वप्न सर्वात प्रथम गोवाच पूर्ण करेल, असा विश्वास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला आहे. गोवा विधानसभेत गुरुवारी ते बोलत होते.

ओम बिर्ला यांनी ‘विकसीत भारत २०४७ आणि प्रतिनिधींची भूमिका’ या विषयावर विचार व्यक्त केले. यावेळी सभापती रमेश तवडकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपसभापती जोशुआ डिसोझा, राज्यातील आजी माजी मंत्री, आमदार उपस्थित होते.

स्वागतपर भाषणात सभापती तवडकर म्हणाले, आम्हाला ‘आत्मनिर्भर भारत’ आणि स्वयंपूर्ण गोवा’ ही दोन्ही ध्येये  पूर्ण करायची आहेत. सभापतिपदाची शपथ घेतली तेव्हापासून मी स्वत:ला लोकसेवेसाठी समर्पित केले आहे. श्रम-धाम योजनेतून मी पाहिलेले एक महत्त्वाकांक्षी स्वप्न आता पूर्णत्वास जात आहे. याशिवाय  शिक्षण, आरोग्य यासारख्या कामासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की दिवंगत राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यानंतर आता देशाचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला गोव्यात लोकप्रतिनिधींना संबोधित करण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. अलीकडेच देशाला नवीन संसद मिळाली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्याच्या वतीने बिर्ला यांचे अभिनंदन केले.

बिर्ला म्हणाले, गोवा देशातच नव्हे, तर जगातील एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण म्हणून उदयास आले आहे. यासाठी प्रयत्न केलेल्या विद्यमान मुख्यमंत्री आणि आजी माजी मंत्र्यांचे मी अभिनंदन करतो.

स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील, त्यावेळेला आपल्याला विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. १९४७ नंतर देखील गोव्याने स्वातंत्र्यासाठी मोठी लढाई लढली. शिक्षण,  आरोग्य ासारख्या क्षेत्रात गोवा पुढे जात आहे ही चांगली बाब आहे.

देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्यासमोर अनेक संकटे होती, पण सामूहिक प्रयत्नाच्या जोरावर देशाच्या विविधतेतील एकता आपण जगाला दाखवून दिली. ७५ वर्षांत देशाची लोकशाही अधिक मजबूत झाली आहे.

पोलिस दलाकडून मानवंदना

विधानसभा पटांगणात विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर गोवा पोलिस दलाकडून मानवंदना स्वीकारून बिर्ला विधानसभेत दाखल झाले.

त्यानंतर त्यांनी सभापती तवडकर आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा लोकसभेमार्फत सत्कार केला, तर सभापती आणि मुख्यमंत्र्यांनी बिर्ला यांना गोव्याची कुणबी शाल, स्मृतिचिन्ह प्रधान केले.

संयुक्त विरोधक एकसंध

लोकसभा अध्यक्षांच्या भाषणावर सर्व विरोधकांनी एकत्रित बहिष्कार टाकला. यात काँग्रेसचे युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा, कार्लुस फेरेरा, आम आदमी पक्षाचे व्हेंजी व्हिएगस, क्रूझ सिल्वा, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि आरजी पक्षाचे विरेश बोरकर यांचा समावेश होता.

आजच्या या विशेष भाषणाला सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार आलेक्स रेजिनाल्ड अनुपस्थित होते.

२५ टक्के आमदारांची दांडी

लोकसभेतील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अपात्रतेचे पडसाद आज विधानसभेत बोलावलेल्या एक दिवसीय विशेष अधिवेशनात उमटले. काही सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनी दांडी मारल्याने उपस्थित सदस्यांची हजेरी केवळ ७५ टक्केच भरली.

विधानसभेत यासाठी सर्व विधानसभा सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, माजी आमदार, मंत्री यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

लोकसभेत राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्यात आले आणि त्यांचा मूलभूत हक्क हिरावून घेतला म्हणून आम्ही संयुक्त विरोधक या भाषणावर बहिष्कार टाकत आहोत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT