Goa Crime: दुपट्टा किलर महानंद येणार कारागृहाबाहेर; 14 वर्षांनंतर प्रथमच मोकळीक

21 दिवसांचा फर्लोग मंजूर ; पोलिसांची राहणार नजर
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime राज्यात खळबळ उडवून देणारा महिलांचा कर्दनकाळ, दुपट्टा किलर महानंद नाईक याला कारागृह अधिकाऱ्यांनी २१ दिवसांचा फर्लोग दिल्याने तो तब्बल १४ वर्षांनंतर प्रथमच कारागृहाबाहेर येणार आहे.

त्याच्यावर १६ महिलांच्या खुनाचे गुन्हे नोंद होते. त्यापैकी दोन प्रकरणांत त्याला जन्मठेपेची तर एका बलात्कार प्रकरणात शिक्षा झाली आहे. त्याला पहिल्यांदाच फर्लोग दिला आहे. तो फर्लोग काळात ज्या परिसरात राहणार, तेथील पोलिसांना त्याच्यावर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Goa Crime
Goa Shramdham Scheme: जनसहभागातूनच त्या वीस जणांचे स्वप्न पूर्ण- बिर्ला

महानंद हा गरीब महिलांना हेरून त्यांच्याशी ओळख करत होता. त्यानंतर त्या महिलेला विवाहाचे आमिष दाखवून पळून जाऊन विवाह करू, असे सांगायचा. येताना या महिलांना तो दागिने घेऊन येण्यास सांगत असे. त्यांना निर्जनस्थळी नेऊन दुपट्‍ट्याने तो गळा आवळून त्यांचा खून करत असे. अंगावरील दागिने काढून मृतदेह निर्जनस्थळी टाकून देत असे.

यादरम्यान, काही महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. राज्यभरातून बेपत्ता झालेल्या व त्यांचा शोध न लागलेल्या विविध पोलिस स्थानकातील महिलांची माहिती जमा करून पोलिसांनी तपास सुरू केला होता.

Goa Crime
Chandigarh Corporators Goa Tour: चंदीगड महानगरपालिकेचे नगरसेवक येणार गोव्यात, 'हे' आहे कारण...

...असा सापडला होता पोलिसांच्या जाळ्यात

महानंदने फोंड्यातील एका गरीब महिलेशी संबंध ठेवले. मात्र, विवाह करण्यास नकार दिल्याने तिने फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर त्याला पोलिस कोठडीत घेतल्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील आणि उपअधीक्षक सेराफिन डायस यांनी त्याच्या कुकृत्यांची मालिकाच उघड केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com