Shram-Dham Scheme Dainik Gomantak
गोवा

Shram-Dham Scheme : श्रम धाम योजनेअंतर्गत 20 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या प्रदान

बिर्ला यांच्या हस्ते चाव्या प्रदान

Rajat Sawant

Canacona News : श्रम धाम योजनेतील 20 लाभार्थींना आज त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, भाजप प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर उपस्थित होते.

ओम बिर्ला यांनी श्रम धाम योजनेतील घरांची पाहणी केली. योजनेतील लाभार्थ्यांची भेट घेतली. यावेळी ही योजना राबवल्याबद्दल बिर्ला यांनी काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांचे आभार मानले. तसेच इतर लोकप्रतिनिधी या योजनेतून प्रेरणा घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

"प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 करोड पेक्षा अधिक घरे बनवून लोकांच्या घरांचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले. लोकांचे सहकार्य तसेच सार्वजनिक निधीतून काणकोण येथील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. सभापती तवडकर यांनी श्रम धाम योजना राबवली. याबद्दल त्यांचे आभार मानतो. इतर लोकप्रतिनिधी या योजनेतून प्रेरणा घेतील असे बिर्ला म्हणाले.

सभापती रमेश तवडकर यांनी काणकोण येथील श्री बलराम चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने श्रम धाम योजना साकारली. काणकोण परिसरात ज्यांना हक्काचे घर नाही किंवा जे आहे ते डबघाईस आले आणि त्याची दुरुस्ती करणे शक्य नाही, अशांना शोधून पक्के घर बांधून देण्याचे ध्येय त्यांनी बागळले.

नागरिकांच्या लोकसहभागातून श्रम धाम ही योजना राबवण्यात येते. ''एक दिवस श्रम आणि एक रुपया'' अशी या योजनेची रचना आहे. त्यानुसार लोकांच्या श्रमदानातून श्रम धाम योजनेतून २० घरे उभारली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

SCROLL FOR NEXT