Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak

Goa Opposition : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भाषणावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

बिर्ला यांनी गोवा विधानसभेत त्यांचे विचार व्यक्त केले
Published on

Om Birla In Goa : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भाषणावर विरोधी पक्षांनी सामूहिक बहिष्कार टाकला. केंद्र आणि राज्य सरकारच्या हुकूमशाही धोरणांचा निषेध करण्यासाठी हा बहिष्कार टाकल्याची माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली. यावेळी काँग्रेसचे केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा उपस्थित होते.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला बुधवारी गोव्यात दाखल झाले. बिर्ला यांनी गुरूवारी गोवा विधानसभेत त्यांचे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सत्ताधारी पक्षांचे इतर सदस्य उपस्थित होते. तर काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड आणि आरजी या विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला.

Yuri Alemao
...तर 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न सर्वात पहिल्यांदा गोवा पूर्ण करेल; लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांचा विश्वास

आलेमाव म्हणाले, "सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाला गृहीत धरले नाही. आमदारांना विश्वासात घेतले गेले नाही. ही एक लोकशाही प्रक्रिया आहे. विरोधक महत्वाची भूमिका बजावतात आणि आम्हाला गृहीत धरले जाऊ शकत नाही.

आलेमाव म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही अशीच वागणूक देण्यात आली आणि उच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात आले. "त्यांना न्याय मिळाला नाही. एका दिवसात त्यांना अपात्र ठरवण्यात आले. ही हुकूमशाही आहे. आम्ही याचा निषेध करतो. म्हणून आम्ही भाषणावर बहिष्कार टाकला," ते म्हणाले.

"भाजप विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून विधानसभेच्या अधिवेशनाचे दिवस कमी करत" असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन गोवा अणि गोयकारांसाठी लढूया" असे आवाहन यावेळी आलेमाव यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com