Aleixo Reginaldo Dainik Gomantak
गोवा

रेजिनाल्ड, रुबर्ट यांच्या नावे सोशल मीडियावर खोटी पत्रके व्हायरल झाल्याने गोंधळ

Lok Sabha Election 2024: आरजीपीचे उमेदवार रुबर्ट परेरा यांनी गोव्याच्या भल्यासाठी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे खोटे पत्रक व्हायरल झाल्याने परेरा यांनी संताप व्यक्त केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Lok Sabha Election 2024: कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजीपी) दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार रुबर्ट परेरा यांच्या नावे काल रात्रीपासून सोशल मीडियावरून खोटी पत्रके व्हायरल होऊ लागल्‍याने तो चर्चेचा विषय बनला होता. मतदानाच्या आदल्याच रात्रीपासून हा प्रकार घडल्याने दोन्ही नेत्यांनी हे कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. मात्र, यासंबंधी कुणीही पोलिसात (Police) तक्रार दाखल केलेली नाही.

दरम्यान, आरजीपीचे उमेदवार रुबर्ट परेरा यांनी गोव्याच्या भल्यासाठी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे खोटे पत्रक व्हायरल झाल्याने परेरा यांनी संताप व्यक्त केला.

मतदानाच्या आदल्या रात्री मी उमेदवारी मागे घेतली असल्याचे एक बनावट पत्रक समाज माध्यमांवर फिरू लागले. असे खोटे सांगून मते मिळवण्याची गरज विरोधकांना का पडली? कारण त्यांनी काहीच कामे केलेली नाहीत. काम न केल्यानेच चुकीच्या पोस्ट घालण्याची गरज पडली. या बनावट पत्रकाविरोधात तक्रार करून योग्य त्या चौकशीची मागणी केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कुंपणंच खातंय शेत', केस मिटवण्यासाठी पोलिसाने घेतली लाच; वाळपईत हेड कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई

Rajmata Jijabai Karandak: गोव्याने गुजरातला हरवले! करिष्माचा मौल्यवान गोल; मुख्य फेरीतील जागा पक्की

GCA: गोव्यातील क्रिकेटमध्ये 107 क्लब ‘किंगमेकर’! ठरणार 13 उमेदवारांचे भवितव्य; अंतिम मतदार यादी जाहीर

Bicholim: अनर्थ टळला! चालकाचे नियंत्रण गेले, कोल्हापूरला जाणारा औषधवाहू ट्रक कलंडला; व्हाळशी जंक्शनवर अपघातांचे सत्र सुरूच

Love Horoscope: तुम्ही जर ब्रेकअपचा विचार करत असाल तर थांबा! 'या' राशींच्या नात्यातील जुने वाद मिटणार

SCROLL FOR NEXT