Benaulim Panchayat Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Benaulim: भाडेकरुंची तपासणी कराच; बाणावली ग्रामसभेत मागणी

Benaulim Panchayat Gramsabha: बाणावली भागात गुन्हेगारी वाढली आहे हा प्रश्‍न आज ग्रामसभेत चर्चेला आला

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: बाणावली भागात गुन्हेगारी वाढली आहे. हा प्रश्‍न आज ग्रामसभेत चर्चेला आला. काही लोकांनी बाणावलीत जे भाडेकरू राहतात, त्यांची पोलिसातर्फे तपासणी व चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

ग्रेफन फर्नांडिस यांनी सांगितले की, बाणावलीत गुन्हेगारी वाढण्यामागे परप्रांतीय तर आहेतच, शिवाय जे स्थानिक पंचसदस्यांचीही प्रभागात नेमके कोण परप्रांतीय राहतात, त्यांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आहे. ज्यांनी घरे भाड्याने दिली आहेत, त्यांनी तसेच पंचांनी अशा व्यक्तींची माहिती जमवून पोलिसांना द्यावी, असे ग्रामसभेत सांगण्यात आले.

याच ग्रामसभेत ‘सनबर्न’ला विरोध दर्शवणारा ठराव तसेच कोकणी रोमी लिपीला मान्यता देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

माजी सरपंच आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले की, ‘सनबर्न’ केवळ उत्तर किंवा दक्षिण गोव्यातच नव्हे तर संपूर्ण गोव्यातच नको आहे. ‘सनबर्न’ला गोव्यातून हद्दपार करणे गरजेचे आहे.

आणखी एका ग्रामस्थाने सांगितले की, आम्ही लहानपणापासूनच कोकणी रोमी लिपीतूनच वाचतो व लिहितो. आजच्या ग्रामसभेत भाषिक अल्पसंख्याक कमीशनरला निवेदन देऊन देवनागरी बरोबर रोमी कोकणीलाही मान्यता देण्याची मागणी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: ‘ओंकार’चा तोरसे, तांबोसेत धुमाकूळ ! लोकांच्या जमावामुळे गोंधळ; कामात अडथळा आणल्यास गुन्हे नोंदवण्याचा इशारा

Goa Crime: घरातून ड्रग्सपुरवठा, 3 दिवस पोलिसांना हुलकावणी, पेडलर 'तेहरान' अखेर फातोर्डा पोलिसांना शरण

Goa Live Updates: महिला पर्यटकाला मनस्ताप देणाऱ्या 3 टॅक्सीवाल्यांना अटक

Codar IIT Project: ‘गोवा विकायला काढलाय’! आयआयटी आंदोलनात काँग्रेसची उडी; विरियातो उठवणार संसदेत आवाज

Adivasi Bhavan: आदिवासी भवनाचे काम 2 महिन्‍यांत सुरू करणार! तवडकरांची हमी; GSIDC कडून प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT