Election Campaign Dainik Gomantak
गोवा

वास्को, मुरगाव, दाबोळीसह कुठ्ठाळीत स्थानिक पक्षानींही घरोघरी प्रचाराचा लावला धडाका

दैनिक गोमन्तक

Election Campaign: मुरगाव तालुक्यात विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा रंग वाढला आहे. वास्को, मुरगाव, दाबोळी, कुठ्ठाळी मतदार संघात राष्ट्रीय पक्षाबरोबर स्थानिक पक्षाने घरोघरी प्रचार व सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. मुरगाव भाजपचे (BJP) उमेदवार मिलिंद नाईक, काँग्रेसचे संकल्प आमोणकर, आम आदमी पक्षाचे परशुराम सोनुर्लेकर, गोवा तृणमूल काँग्रेसचे (TMC) जयेश शेटगावकर, अपक्ष उमेदवार निलेश नावेलकर यांनी घरोघरी प्रचारा बरोबर कोपरा बैठका सभा घेऊन प्रचार करीत आहे.

मुरगाव मतदार संघात 2007 ते 2017 पर्यंत भाजपचे उमेदवार मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी हॅट्रिक साधलेली आहे. यामुळे संपूर्ण मुरगावात भाजपचे वर्चस्व गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत राहिलेले आहे. तर मुरगावात गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत फक्त काँग्रेस व भाजप यांच्यात सरळ लढत झालेली आहे. यामुळे इतर पक्षांना या मतदार संघात पाहिजे त्याप्रमाणे मताधिक्य प्राप्त होत नाही. काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर यांनी दोन विधानसभा निवडणुकी भाजपचे उमेदवार मिलिंद नाईक यांना बऱ्यापैकी लढत दिलेली असून 2017 च्या निवडणुकीत आमोणकर अवघ्या 140 मताने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे 2022 गोवा विधानसभा निवडणुकीत मुरगावतून कोण बाजी मारणार ते लवकरच कळणार आहे. मुरगावमध्ये आम आदमी पक्षाचे परशुराम सोनूर्लेकर दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत आपले कौशल्य आजमावणार असून त्यांचा प्रचार संपूर्ण मतदारसंघात जोरात सुरू आहे.

मुरगाव बरोबर संपूर्ण गोव्यात बेकायदेशीर कामा विरूद्ध आवाज उठविण्या बरोबर सरकारच्या विरोधात वाचा फोडणारे म्हणून सोनुर्लेकर यांना जनता ओळखत आहे. यामुळे त्यांना मतदारांचा यंदा कोल मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोवा तृणमूल काँग्रेसचे उमेदवार उमेदवार जयेश शेटगावकर शिक्षित, व्यवसायिक युवक असून सडा भागात बर्‍यापैकी परिचयाचे असून त्यांना सध्या वाढता प्रतिसाद लाभत आहे. अपक्ष उमेदवार निलेश नावेलकर याने सुद्धा प्रचारात बऱ्यापैकी मजल मारली असल्याने निवडणूक रंगात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

Goa Today's News Live: दक्षिण गोव्यातील स्विगी डिलिव्हरी बॉईज संपावर

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

गोव्याच्या लोकसंस्कृतीत 'घुमट वाद्याला' अनन्यसाधारण स्थान का आहे? चर्मवाद्यांच्या विशेष योगदानाबद्द्ल जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT