Petrol Pump in Goa Dainik Gomantak
गोवा

कळंगुटमध्ये पेट्रोलपंपासाठी स्थानिक एकवटले

पेट्रोल भरण्यासाठी इतरत्र जावं लागत असल्याने नाहक भुर्दंड, विरोध न करण्याचं आवाहन

दैनिक गोमन्तक

कळंगुट : पेट्रोलपंप नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचं सांगत कळंगुटवासियांनी पंपाची मागणी केली आहे. गावात पेट्रोल पंपच नसल्याने स्थानिकांना अन्यत्र पेट्रोल भरण्यासाठी जावं लागतं. साहजिकच त्यांना नाहक भुर्दंड पडतो. त्यामुळे आता स्थानिकांमधून पेट्रोल पंपाची मागणी जोर धरु लागली आहे. (Petrol Pump in Goa News Updates)

गावामध्ये पेट्रोल (Petrol) पंप नसल्याने कळंगुटवासियांना आपपासच्या परिसरात पेट्रोल भरण्यासाठी जावं लागतं. हणजुणे, पर्रा, नेरुल, साळगाव याठिकाणी जाऊन पेट्रोल भरताना कळंगुटवासियांची मोठी गैरसोय होते. कळंगुट (Calangute) पर्यटनाचं केंद्र असल्याने पर्यटकांनाही पेट्रोल पंपसाठी शोधाशोध करावी लागते. रविवारी झालेल्या ग्रामसभेत एकमताने पेट्रोलपंपाची मागणी करण्यात आली. त्यामुळे लवकरच कळंगुटवासियांची धावाधाव थांबण्याची शक्यता आहे.

दरम्यान गावात पंपासाठीचा मसूदा तयार होता. मात्र काही लोकांनी केवळ पैशांसाठी या पंपाला विरोध केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. राज्यातील (Goa) बहुतांश पंप हे शेतीच्या जमिनीवरच उभारलेले आहेत, मात्र कळंगुटमधील पेट्रोलपंपालाच विरोध का होतोय? केवळ विरोधाला विरोध न करता पेट्रोल पंप होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही स्थानिकांनी केलं आहे. दरम्यान कळंगुटचे सरपंच शॉन मार्टिन्स यांनीही मालकाला आवश्यक त्या सर्व परवानग्या दिल्या असून पंपासाठी प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT