Goa Congress Meeting
पणजी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून लढवायाच्या नाहीत. पक्षाने स्वबळावर या निवडणुका लढवाव्यात, असा सूर काँंग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आळवला.
गोवा चेबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख, पक्षाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, आघाडीचे प्रमुख आणि गोवा काँग्रेसच्या सेलचे अध्यक्ष यांची उपस्थिती होती. राज्यातील चाळीसही मतदारसंघांत काँग्रेस पक्ष मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे, तसेच संविधान बचावसह भाजप सरकारच्या ‘कॅश फॉर जॉब’ सारख्या घोटाळ्यांबाबत जनतेत जागृती करण्याचा निश्चय आज बैठकीत करण्यात आला.
दरम्यान, पाटकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ध्येय व धोरणे काय असावीत हे समजवून सांगितली. पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबर युवा वर्ग, महिला व जुन्या जाणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारायला हवी.
त्याचबरोबर राज्यातील भाजप सरकारचे अपयश, भ्रष्टाचार याविषयी लोकांमध्ये जागृती करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय राज्यातील प्रमुख व स्थानिक विषय जनतेत तसेच महिला वर्गापर्यंत नेण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचेही मान्यवरांनी बैठकीत सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.