Dairy Plant In Goa: राज्यात दुग्धपेढी स्थापन करणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा; इंडियन ऑईल कार्पोरेशन करणार सहकार्य

CM Pramod Sawant: इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या (आयओसी) सहकार्याने राज्यात सरकार दुग्धपेढी स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.
CM Pramod Sawant, indian oil corporation
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant announced Milk Dairy Plant

पणजी: इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या (आयओसी) सहकार्याने राज्यात सरकार दुग्धपेढी स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. इंडियन ऑईलची सामाजिक दायित्व योजना व आरोग्यम यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेली दीनदयाळ आरोग्य सेवा इस्पितळाची इमारत दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानकडे सोमवारी हस्तांतरित करण्यात आली.

मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते मंत्रालयात हा हस्तांतरण सोहळा पार पडला. या इमारतीत ५० खाटांचे ॲलोपथिक व आयुर्वेदिक इस्पितळ आहे. देशात आयओसीच्या संयुक्त विद्यमाने अशा प्रकारची दुग्धपेढी उभारण्यात आल्या आहेत, त्याप्रमाणे गोव्यातही ती उभारली जाईल. गोव्यात दूध संकलनासाठी वाव असून, त्या अनुषंगाने सरकारने प्रयत्न सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले.

बेंदुर्डे-पोळे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १ हजार ३७६ कोटी रुपये मंजूर केल्याने त्यांचे आभारही मुख्यमंत्र्यांनी मानले. राज्यातील रस्त्याच्या कामांसाठी गडकरी यांनी केलेल्या मदतीमुळे महामार्ग, राज्य मार्गांचे काम मार्गी लागले आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पर्यटन व वाहतूक क्षेत्रासाठी ही फार मोठी उपलब्धी ठरणार आहे.

CM Pramod Sawant, indian oil corporation
Sunburn Festival 2024: ‘सनबर्न’ मान्‍यतेवरुन विशेष ग्रामसभेची जोरदार मागणी; प्रसंगी घुसून महोत्‍सव बंद करु, आमदार आर्लेकरांचा इशारा

डबल इंजीनचा लाभ!

काणकोण बगल मार्गाचे काम रखडले होते आणि ते केव्हा सुरू होणार याविषयी सतत प्रश्न उपस्थित होत होते. २२ किलोमीटरचे हे चौपदरीकरणाचे काम झाल्यानंतर वाहतुकीची मोठी समस्या सुटणार आहे. गोव्यात रस्ते, पूल व इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी डबल इंजीन सरकारने निधीच्या बाबतीत कमतरता ठेवलेली नाही. चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मडगाव-काणकोण ते कारवार ही शहरे जोडली जाणार आहेत. आर्थिकदृष्ट्या गोव्याला त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com