School Opening Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आजपासून शाळा पुन्हा गजबजणार

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षे बंद असलेल्या सर्व शाळा आणि महाविद्यालये आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत.

तशी अधिसूचना शिक्षण खाते आणि गोवा विद्यापीठाने गुरुवारीच काढली होती. मात्र, शाळा, महाविद्यालये सुरू करताना कोरोनासंबंधीच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे शाळा व्यवस्थापनांना पालन करावे लागणार आहे. पालकांमधून मात्र शाळा सुरू करण्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासन आणि व्यवस्थापन समिती शाळा सुरू करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात अजूनही कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्याने शाळा नियमित; पण 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्या आठवड्यातून तीन दिवस सुरू असतील. शाळा सुरू होत असल्याचे प्रशासनाने जाहीर करताच पालकांनी गणवेश घेण्यासाठी धावाधाव केली. वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, थर्मल गनच्या साहाय्याने तापमान तपासणे यांची अंमलबजावणी होणार आहे.

शाळांनी वेळा बदलल्या

शाळा सुरू करण्याबाबत व्यवस्थापन समितीला अधिकार देण्यात आले असून शाळा सुरू करणे, शाळांच्या वेळा ठरणे आणि इतर बाबतीतील अधिकार व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहेत. मात्र, कोरोनासंदर्भातील आदर्श कार्यप्रणालीची अंमलबजावणी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे काही शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

गणवेशाची सक्ती नाही

विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती करण्यात येणार नाही. शाळांच्या परीक्षा मार्च महिन्याच्या अखेरीस होणार असल्याने शाळा केवळ एक महिनाच चालतील. त्यामुळे एका महिन्यासाठी मुलांसाठी नवीन गणवेश विकत घेणे हे अनेक पालकांसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. कारण मुलांच्या शाळा बदलल्या, की गणवेशही बदलतो. शिवाय सध्या गणवेशांचा तुटवडाही भासत आहे.

परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार : विद्यापीठ

गेली दोन वर्षे शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होत्या. त्यामुळे काही परीक्षाही ऑनलाईन होत्या. मात्र, यावर्षीच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा ऑफलाईन पद्धतीने म्हणजे विद्यार्थ्यांनी वर्गात हजर राहून द्याव्या लागणार आहेत. यासाठी नव्याने शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती शिक्षण खात्याच्या वतीने देण्यात आली. महाविद्यालयीन परीक्षांबाबत विद्यार्थी आणि गोवा विद्यापीठ यांच्यातला संघर्ष वाढला होता. त्यामुळे परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या की ऑनलाईन याबाबतचा गोंधळ अद्यापही कायम आहे. मात्र, अंतिम वर्गाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत, असे विद्यापीठाने यापूर्वीच जाहीर केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT