varca murder case
varca murder caseDainik Gomantak

संशय खरा ठरला, वार्का हत्ये प्रकरणी लेकीला अटक

वृद्धाच्या हत्ये प्रकरणी त्याची मुलगी जुबेल मार्टिन्सला आज कोलवा पोलिसांनी केली अटक
Published on

मडगाव : वार्का येथे झालेल्या त्रिनिदाद मार्टिन्स या 80 वर्षीय वृद्धाच्या खून प्रकरणी त्याची मुलगी जुबेल मार्टिन्स (37) हिला आज कोलवा पोलिसांनी अटक केली. मागचे तीन दिवस पोलिसांनी तिची चौकशी चालू ठेवली होती.

तीन दिवसापूर्वी रात्री आठच्या सुमारास वार्का (varca) परिसरात हा खून झाला होता. आपल्या मुलीशी पटत नसल्याने घरात एकटाच राहणाऱ्या या वृद्धाच्या डोक्यावर लोखंडी दांड्याचा प्रहार करून त्याचा खून (murder) करण्यात आला होता.

varca murder case
पर्वरीत क्रिकेट बेटिंग छाप्यात 6 जणांना अटक, 5 लाखांचा माल जप्त

पोलिसांनी (police) या प्रकरणी अज्ञाता विराधात बेकायदेशीर रित्या घरात शिरून खून केल्याचा गुन्हा नोंद केला होता. मार्टिन्स याचे आपल्या मुलीशी नाते तणावाचे होते. घराच्या मालकीवरून त्यांच्यात वाद होता. त्यामुळे हा खून त्याच्याच मुलीने केला असावा असा संशय पोलिसांना होता. शेवटी हा संशय खरा ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com