CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

गोव्यात खातेवाटपानंतर ‘थोडी खुशी थोडा गम’

फोंड्याला तीन मंत्री: गोविंद गावडेंना क्रीडा खाते मिळाल्याने समाधान

दैनिक गोमन्तक

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रिमंडळाचे खाते वाटप केल्यानंतर फोंड्यात ‘थोडी खुशी थोडा गम’ असे वातावरण दिसले. फोंडा तालुक्यात एकंदरीत तीन मंत्री असल्यामुळे लोकांचे या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार यावर लक्ष लागून राहिले होते. या तीन मंत्र्यांत रवी नाईक यांच्यासारखा मुख्यमंत्रिपद, खासदारकीसारखी महत्त्वाची पदे भूषविलेले मंत्री असल्यामुळे लोकांची उत्कंठा अधिकच वाढली होती.

वास्तविक डॉ. सावंतांच्या मंत्रिमंडळात रवी हे सर्वात अनुभवी मंत्री. 25 जानेवारी 1991 ते 18 मे 1993 पर्यंत रवी मुख्यमंत्री होते आणि या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले होते. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2000 ते एप्रिल 2002 पर्यंत ते पर्रीकर सरकारात उपमुख्यमंत्री होते. 2007 ते 2012 पर्यंत ते दिगंबर कामत सरकारात गृहमंत्री होते. एवढी महत्त्वाची पदे भूषविल्यामुळे यावेळी रवींना साबांखा खाते तरी मिळणार असे वाटत होते, पण त्यांना कृषी, हस्तकला तसेच नागरीपुरवठा, ग्राहक व्यवहार या खात्यांवर समाधान मानावे लागले.

रवींनंतर सुभाष शिरोडकरांचा नंबर लागतो. सुभाष हे आठवेळा निवडून आले असून त्यांनीही काँग्रेस सरकारात अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. यावेळी त्यांच्या वाट्याला सहकारसारखे महत्त्वाचे खाते आले असल्यामुळे ते सहकार क्षेत्राला एक नवी उंची देतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सहकार क्षेत्र हे गोव्यातील एक प्रमुख क्षेत्र. सध्या गोवाभर सहकार क्षेत्राचे जाळे विणलेले दिसत आहे. त्यातून अनेक समस्याही निर्माण झाल्या आहेत. आता शिरोडकर हे या समस्यांना कसा न्याय देतात हे बघावे लागेल. त्याचबरोबर जलस्रोत व प्रोव्हेदोरिया ही खातीही त्यांच्या वाट्याला आली आहेत. जलस्रोत द्वारा पाण्याचे नियोजन करण्यास वाव असल्यामुळे ते या खात्यालाही एक वेगळे स्वरूप देऊ शकतात. जलस्रोत खात्याच्या माध्यमातून नियोजन करताना पुरेशा पाण्याचे संवर्धन कसे होईल याकडे त्यांना लक्ष द्यावे लागेल.

तिसरे मंत्री गोविंद गावडे हे रवी व सुभाष यांच्या मानाने कमी अनुभवी असले तरी गेल्यावेळी ते मंत्री असल्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा बऱ्यापैकी अनुभव आला आहे. यावेळी गेल्या खेपेप्रमाणे कला व संस्कृती खाते त्यांच्या वाट्याला आले असल्यामुळे ते या खात्याची संबंधित राहिलेले उपक्रम पूर्णत्वास नेतील अशी आशा वाटते. कला अकादमीचे नूतनीकरण अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही. गावडे मंत्री असतानाच हे नूतनीकरण सुरू झाले होते आणि आता परत ते मंत्री झाल्यामुळे या नूतनीकरणाला चालना मिळेल अशी अपेक्षा कलाकारांकडून व्यक्त होत आहे. गोविंद गावडे यांना मिळालेले आणखी एक महत्त्वाचे खाते म्हणजे क्रीडा खाते. क्रीडा खाते त्यांना दिल्यामुळे क्रीडाप्रेमींच्या आशा वाढल्या आहेत. क्रीडा हे युवकांच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते गणले जाते, पण सध्या या क्षेत्रात थोडीफार मरगळ आल्यासारखी वाटायला लागली आहे. मंत्री गावडेंना प्रथम ती मरगळ दूर करावी लागेल.

त्याचप्रमाणे आपल्या प्रियोळ मतदारसंघातील काही क्रीडा संबंधित प्रकल्पही पूर्णत्वास न्यावे लागतील. यातले सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळचे मैदान. हे मैदान झाल्यास त्याचा फायदा पूर्ण फोंडा तालुक्याला होऊ शकतो. त्याचप्रमाणे केरी - फोंडा येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी व एकलव्य निवासी शाळा यांनाही ते मूर्तस्वरूप देऊ शकतात. एकंदरीत क्रीडा मंत्री म्हणून त्यांच्यापुढे जबरदस्त आव्हान उभे आहे आणि गोव्यातील युवा क्रीडापटू तसेच गोवा भर विखुरलेले क्रीडाप्रेमी त्यांच्याकडे आशेने पाहात आहेत. हे खाते गोविंद यांना दिल्यामुळे ते फोंडा तालुक्याला एक वरदान ठरू शकते. त्याचप्रमाणे ग्रामीण विकास खात्याचाही ते चांगल्या रीतीने उपयोग करू शकतात. ज्या मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात तो प्रियोळ मतदारसंघ ग्रामीण असल्यामुळे या खात्याचा प्रियोळचा विकास करण्याकरिता चांगला उपयोग होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

SCROLL FOR NEXT