वास्कोतील नौदल म्युझियम विमानप्रेमींना समर्पित

नवीन संग्रहालय अभ्यागतांना नौदल उड्डाणाच्या एका शानदार प्रवासात घेऊन जाणार
Refurbished Naval aviation museum in Vasco dedicated to aviation enthusiasts
Refurbished Naval aviation museum in Vasco dedicated to aviation enthusiasts Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: दाबोळी येथे पूर्णत: नूतनीकृत नौदल एव्हिएशन म्युझियम काल सोमवार दि. 4 एप्रिल रोजी गोवा क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल फिलिपोस जी प्यनुमूतिल यांच्या हस्ते विमानप्रेमींना समर्पित करण्यात आले. नवीन संग्रहालय अभ्यागतांना नौदल उड्डाणाच्या एका शानदार प्रवासात घेऊन जाणार आहे, ज्यामध्ये अनेक सुविधा आहेत. सदर‌‌ म्युझियम आशियातील एक नावीन्यपूर्ण व गोव्यातील पहिल्‍या पाच ठिकाणांपैकी एक असल्याचे प्यनुमूतिल यांनी सांगितले.

Refurbished Naval aviation museum in Vasco dedicated to aviation enthusiasts
मडगाव पालिका बैठकीला सत्ताधाऱ्यांचीच दांडी

या म्युझियमने 2020 मध्ये ट्रिप अॅडव्हायझरचा ‘ट्रॅव्हलर्स चॉईस अवॉर्ड’ जिंकला होता. 1998 मध्ये आठ विमानांच्या संग्रहाने नौदल एव्हिएशन म्युझियमची सुरुवात केली, ती विमाने आणि इतर प्रदर्शनांची विस्तृत विविधता जोडून आणि नौदलाच्या ऐतिहासिक परिक्रमांचे चित्रण करत गेल्या काही वर्षांत यात वाढ केली असल्याचे ते म्हणाले. विमानप्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे.

या म्युझियमध्ये चपळ ऑडिओ-व्हिज्युअल द्वारे विमान चालवणे, तसेच गेल्या काही वर्षांमध्ये नौदल उड्डाण क्षेत्रातील प्रभावी परिवर्तनाचे प्रतिबिंब, संग्रहालयाच्या काळजीपूर्वक क्युरेट केलेल्या सुविधांमध्ये 'अधवन' - नौदल विमानचालनाचा कालबद्ध इतिहास, 'अद्वितिया' - भारतीय नौदलाच्या हवाई स्थानकांची आणि स्क्वाड्रन्सची झलक पाहणे, एव्हिएशन सपोर्ट युनिट्स आणि 'विमान' मध्ये - समकालीन आणि विंटेज विमान मॉडेल्सचा एक सुंदर संग्रह स्थापित केला आहे.'द फर्स्ट, द लिजेंड्स', 'दृष्टी' हे 1971 च्या भारत-पाक युद्धातील हवाई ऑपरेशन्सचे सचित्र प्रदर्शित केले आहे. तसेच 'गोवा लिबरेशन'ला समर्पित एक भिंत चित्रित केली आहे.

वेगवेगळ्या या संग्रहाला भेट देणाऱ्या दिव्यांग अतिथींना मदत करण्यासाठी संग्रहालयात रॅम्प बसविण्यात आले आहेत. त्याच्या इतर सुविधांमध्ये ग्लास कॉकपिट कॅफे, स्मरणिका दुकान आणि समर्पित पार्किंग जागा यांचा समावेश आहे. पर्यटक 'व्यूहा' या सेल्फी कॉर्नरवर त्यांच्या आठवणी नोंदवू शकतात आणि 'क्षितिज' या व्ह्यूइंग गॅलरीमधून पार्क केलेल्या विमानाच्या विहंगम दृश्याचा आनंद घेऊ शकतात. एव्हिएशन प्रेमींसाठी, व्हर्च्युअल रिअॅलिटी कॉर्नर उड्डाणाचा कधीही न होणारा थरार प्रदान करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com