Goa CM Pramod Sawant viral video Dainik Gomantak
गोवा

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

Viral video Pramod Sawant: साखळी येथील रवींद्र भवनात गरजू नागरिकांची भेट घेत असताना एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे

Akshata Chhatre

साखळी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. याच अनुषंगाने रविवार (दि.३) रोजी साखळी येथील रवींद्र भवनात गरजू नागरिकांची भेट घेत असताना एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मोपा-पेडणे येथील गंधाली उमेश गाड या चिमुकलीने मुख्यमंत्र्यांना खास गोमंतकीय भेट दिली आणि हा क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

गंधाली तिच्या वडिलांसोबत मुख्यमंत्र्यांना भेटायला आली होती, मात्र ती एकटीच नाही तर सोबत खास भेट घेऊन आली होती. गोव्यात पातोळ्यांना एक खास महत्त्व आहे. मुळातच नारळाच्या खोबऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यात श्रावण महिन्यात नागपंचमीचा सण साजरा केला जातो आणि नंतर येणाऱ्या चतुर्थीच्या निमित्ताने पातोळ्या किंवा उकडीच्या मोदकांची चव चाखायला मिळते. हळदीच्या पानांमध्ये गुंडाळून तयार केल्या जाणाऱ्या या खास पारंपरिक पदार्थाला गोव्याच्या संस्कृती आणि सणांमध्ये एक विशेष स्थान आहे.

गंधाली सुद्धा अशाच पातोळ्यांनी भरलेली एक पिशवी घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला आली होती. मुख्यमंत्र्यांनी तिच्या हातातली पिशवी पाहताच तिला प्रेमळपणे कोकणी भाषेत विचारले, "तू किदे हाडला गो?" म्हणजेच "तू काय आणलेस ग?" त्यावर गंधालीने "पातोळ्या" असे उत्तर दिल्यावर मुख्यमंत्री खूप आनंदित झाले. त्यांनी लगेचच, "घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" (म्हणजेच, "सगळ्यांनी पातोळ्या खा") असे म्हणत तिथे जमलेल्या सर्वांना पातोळ्या वाटायला सांगितल्या.

एका लहान मुलीने दिलेल्या भेटवस्तूचा मुख्यमंत्र्यांनी इतक्या आपुलकीने स्वीकार केल्याने आणि सर्वांसोबत तो आनंद वाटून घेतल्याने या प्रसंगाने अनेकांची मने जिंकली आहेत. मुख्यमंत्री सावंत यांच्या या कृतीचे आणि गोमंतकीय संस्कृती जपण्याच्या या दृश्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT