Margao News Dainik Gomantak
गोवा

Margao News: गोमंत विद्या निकेतनचे प्रभुगावकर, जाण आणि पारकर यांना साहित्य पुरस्कार जाहीर

कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News गोमंत विद्या निकेतनचे साहित्य आणि इतर पुरस्कार जाहीर करण्यात आले असून कमलाक्ष प्रभुगावकर यांच्या 'मातीला सुगंध फुलाचा' या कथा संग्रहाला, सुभाष जाण यांच्या 'शिंपण' तसेच महेश पारकर यांच्या 'विचारविश्व' या लघू निबंध संग्रहाना यंदाचे साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

25 मार्च रोजी संस्थेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमांत कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. विद्या निकेतनचे अन्य पुरस्कारही जाहीर झाले असुन 26 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ते दिले जाणार आहेत.

यंदाचा केशव अनंत नायक स्मृती समाजसेवक पुरस्कार पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते अभिजित प्रभुदेसाई याना, काशिनाथ दामोदर नायक स्मृती सामजिक कृतज्ञता पुरस्कार विशेष मुलांची शाळा चालविणाऱ्या चेतना चेरीटेबल ट्रस्ट या संस्थेला, कविवर्य दामोदर अच्युत कारे स्मृती गोमंतदेेवी पुरस्कार कवी प्रकाश होळकर याना तर महिला उद्योजकांना देण्यात येणारा पिरूबाय दलाल स्मृती स्वयंसिद्धा पुरस्कार आघाडीच्या फेशन डिझायनर वर्मा डिमेलो याना देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: जिममध्ये साडीचा स्वॅग! काळ्या साडीत ट्रेडमिलवर तरुणीने धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'विषय हार्ड!'

illegal LED fishing: वास्कोत बेकायदेशीर 'एलईडी' मासेमारीचा पर्दाफाश; मत्स्यव्यवसाय विभागाकडून तीन बोटी जप्त

Dhuler: सफर गोव्याची! म्हापसा आणि कुचेली या गावच्या सीमेवरचे, मातीचे ओढ लावणारे 'धुळेर'

VIDEO: "हे संकट लवकर संपलं पाहिजे", पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतासमोर मोठं आव्हान, PM मोदींकडून जगाला शांततेचा संदेश

मोफत एन्ट्री अन् स्टेडियमचा फील! 'BCCI'चं क्रिकेटप्रेमींना मोठं गिफ्ट; IPL 2026 चे सामने 'या' 15 शहरांमध्ये पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT