

डिचोली: कारापूर येथील वादग्रस्त मेगा गृहनिर्माण प्रकल्पासाठी अडवलेल्या पायवाटा मोकळ्या करण्याची तयारी संबंधित प्रकल्प बांधकाम कंपनीने दर्शवली आहे.
मात्र, कंपनीने उपस्थित केलेल्या अटी आता ‘कळी’चा मुद्दा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अटी कारापूरवासीयांना मान्य नाहीत. त्यामुळे वादग्रस्त प्रकल्प विरोधातील आंदोलनाची धग कायम असून, हे आंदोलन चालूच राहणार असल्याचे स्पष्ट आहे.
वादग्रस्त प्रकल्पासंबंधी जनतेच्या भावनांचा विचार करून काल डिचोलीत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालय चेंबरमध्ये झालेल्या या बैठकीस मामलेदार, पोलिस अधिकारी, प्रकल्प बांधकाम कंपनीचे संचालक तसेच आंदोलनकर्त्यां नागरिकांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने पारंपरिक पायवाटांचा मुद्दा चर्चेत आला. ज्या पायवाटा बंद करण्यात आल्या आहेत. त्या पायवाटांवरील अडथळे दूर करण्याचे संबंधित बांधकाम कंपनीने मान्य केले. कालच्या बैठकीत ठरल्यानुसार कारापूर-सर्वण पंचायतीतर्फे आज प्रकल्प स्थळाची पाहणी केली. यावेळी तीन पायवाटा मोकळ्या केल्याचे आढळून आले. यावेळी प्रभारी सरपंच बीबी आयेशा मागोड यांच्या उपस्थितीत पंचायत सचिवांनी ही पाहणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.