List Of All Loksabha Candidates From Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha: उत्तर, दक्षिणेत 6 अपक्ष उमेदवार कोण आहेत, कोणतं मिळालं चिन्ह? एकूण 16 उमेदवार रिंगणात

List Of All Loksabha Candidates From Goa: गोव्यात मुख्य लढत काँग्रेस, भाजप आणि आरजीच्या उमेदवारांमध्ये होणार असली तरी दोन्ही मतदारसंघातील इतर उमेदवार कोण याची उत्सुकता नागरिकांना आहे.

Pramod Yadav

List Of All Loksabha Candidates From Goa

गोव्यातील लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, दोन्ही मतदारसंघातून एकूण सोळा उमेदवार रिंगणात आहेत. उत्तर आणि दक्षिणेत प्रत्येकी तीन अपक्ष उमेदवार आहेत. याशिवाय बहुजन समाज पार्टी, अखिल भारतीय परिवार पार्टी आणि करप्शन एबॉलिशन पार्टीचे उमेदवार देखील रिंगणात आहेत.

गोव्यात मुख्य लढत काँग्रेस, भाजप आणि आरजीच्या उमेदवारांमध्ये होणार असली तरी दोन्ही मतदारसंघातील इतर उमेदवार कोण याची उत्सुकता नागरिकांना आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने राज्यात उत्तर आणि दक्षिणेत प्रत्येकी आठ उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रिव्होल्युशनरी गोवन्स (RG) पक्षाने आघाडीसमोर ठेवलेल्या अटी मान्य न केल्याने त्याही उमेदवारांनी माघार घेतली नाही. यामुळे काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीची मते फुटणार हे स्पष्ट झाले आहे. याशिवाय मैदानात असणारे इतर उमेदवार देखील काही प्रमाणात मते घेतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोणते उमेदवार?

उत्तर गोवा (North Goa Loksabha Candidates)

1) श्रीपाद नाईक (भाजप - कमळ)

2) ॲड. रमाकांत खलप ( काँग्रेस - हात)

3) तुकाराम परब ( आरजी- फुटबॉल)

4) मिलन वायंगणकर (बहुजन समाज पार्टी- हत्ती)

5) सखाराम नाईक (अखिल भारतीय परिवार पार्टी- किटली)

6) थॉमस फर्नांडिस (अपक्ष - अन्नाने भरलेले ताट)

7) ॲड. विशाल नाईक (अपक्ष - गॅस सिलिंडर)

8) शकील शेख (अपक्ष - हेल्मेट)

दक्षिण गोवा (South Goa Loksabha Candidates)

1) पल्‍लवी धेंपे (भाजप - कमळ)

2) विरियातो फर्नांडिस ( काँग्रेस - हात)

3) रुबर्ट परेरा ( आरजी- फुटबॉल)

4) डॉ. श्वेता गावकर (बहुजन समाज पार्टी- हत्ती)

5) हरिश्चंद्र नाईक (करप्शन एबॉलिशन पार्टी - फुटबॉल खेळाडू)

6) आलेक्सी फर्नांडिस (अपक्ष - फणस)

7) डॉ. कालिदास वायंगणकर (अपक्ष - बोट)

8) दीपकुमार मापारी (अपक्ष - सीसीटीव्ही कॅमेरा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

डिचोलीच्या दहीहंडीत आमदारांनी धरला ठेका, Video Viral!

Salpe Lake: साळपे तलावासंदर्भात लढा सुरू राहील! आल्वारीस यांचा इशारा; कडक उपाययोजनेची आवश्यकता

Margao: 6 महिन्यांमध्ये 10 कोटींचे लक्ष्य! मडगाव पालिकेने कसली कंबर; 35 कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट्य

SCROLL FOR NEXT