Alcohol Seized  Dainik Gomantak
गोवा

Alcohol Seized : महाराष्‍ट्रातून गोव्‍यात आणलेली ८.४१ लाखांची दारू पकडली

Alcohol Seized : सासष्‍टीच्‍या अबकारी खात्‍याचे निरीक्षक शांबा नाईक यांनी ही कारवाई केली. ही एकूण दारू ३३४६ लिटर एवढी असून यात प्रामुख्‍याने ऑफिसर्स चॉईस व्‍हिस्‍कीच्‍या बाटल्‍या भरल्‍या होत्‍या, अशी माहिती नाईक यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Alcohol Seized :

मडगाव, निवडणुकीच्‍या काळात महाराष्‍ट्रातून गोव्‍यात आणलेली ८.४१ लाखांची बेकायदा दारू आज अबकारी खात्‍याच्‍या भरारी पथकाने कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीजवळ जप्‍त केली. एका मोठ्या कंटेनरमध्‍ये भरून ही दारू आणली होती.

अबकारी खात्‍याने हा कंटेनरही जप्‍त केला आहे. या कंटेनरची किंमत २५ लाख रुपये असल्‍याची माहिती देण्‍यात आली.

सासष्‍टीच्‍या अबकारी खात्‍याचे निरीक्षक शांबा नाईक यांनी ही कारवाई केली. ही एकूण दारू ३३४६ लिटर एवढी असून यात प्रामुख्‍याने ऑफिसर्स चॉईस व्‍हिस्‍कीच्‍या बाटल्‍या भरल्‍या होत्‍या, अशी माहिती नाईक यांनी दिली.

या कारवाईची चाहुल लागल्‍यानंतर ट्रकचालक ट्रक तिथेच सोडून पळून गेले अशी माहिती नाईक यांनी दिली. ही कारवाई सहाय्‍यक आयुक्‍त संकेत साखरदांडे आणि एस. ई. सहाय्‍यक अधीक्षक नीलेश नाईक यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel: ‘बजेट’ शिपायाने बनवले काय? चिंबल ग्रामसभेत सरपंचांना संतप्त सवाल; पंचायत मंडळावर ग्रामस्थांची जोरदार टीका

Goa Politics: खरी कुजबुज; परप्रांतीयांची मते कुणाकडे?

Virat Kohli: '..तर मी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार नाही'! कोहलीच्या विधानाने चाहत्यांना धक्का; तुफानी फटकेबाजीबद्दल म्हणाला की..

CM Pramod Sawant: ‘कशे आसात दोतोर?’ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साखळीत गर्दी; आरोग्याची केली विचारपूस

Ponda By Election: फोंड्यात राजकीय ‘पारा’ वाढू लागला! भाजप-काँग्रेस आक्रमक; लैंगिक शोषण प्रकरणाचाही मुद्दा

SCROLL FOR NEXT