टॅक्सी भाड्यात सुधारणा, किमान दर 300 रुपये; पिवळ्या-काळ्या, टुरिस्ट टॅक्सींचे दर वाढले: शनिवारपासून नव्या भाडेरचनेनुसार प्रवास

Goa Taxi Fare: राज्य परिवहन प्राधिकरणाने पिवळ्या-काळ्या टॅक्सी तसेच समुद्रकिनारी भाग आणि स्टार हॉटेलांशी संलग्न टुरिस्ट टॅक्सी, मोटार कॅब व मॅक्सी कॅबसाठी सुधारित अंतराधारित भाडेदर अधिसूचित केले असून, हे दर आजपासून लागू झाले आहेत.
Goa Taxi Fare
Goa Taxi FareDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्यातील टॅक्सी प्रवास आता नव्या भाडेरचनेनुसार होणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने पिवळ्या-काळ्या टॅक्सी तसेच समुद्रकिनारी भाग आणि स्टार हॉटेलांशी संलग्न टुरिस्ट टॅक्सी, मोटार कॅब व मॅक्सी कॅबसाठी सुधारित अंतराधारित भाडेदर अधिसूचित केले असून, हे दर आजपासून लागू झाले आहेत. ऑगस्ट २०२१ मधील जुन्या दररचनेचे अधिक्रमण करून ही नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

पिवळ्या-काळ्या टॅक्सींसाठी हॅचबॅक व सेडानच्या पहिल्या तीन किलोमीटरचे भाडे ३०० रुपये, नियमित एसयूव्हीसाठी ४०० रुपये आणि प्रीमियम एसयूव्हीसाठी ५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. ३.१ ते ८ किलोमीटरसाठी हे दर अनुक्रमे ४३०, ५६० आणि ६६० रुपये आहेत. आठ किलोमीटरनंतर हॅचबॅक व सेडानसाठी २६ रुपये, तर एसयूव्हीसाठी ३२ रुपये प्रतिकिलोमीटर आकारले जातील. टुरिस्ट

टॅक्सींसाठी वाहनाच्या प्रकारानुसार पहिल्या तीन किलोमीटरचे भाडे ३०० ते १,००० रुपये आहे. ३.१ ते ८ किलोमीटरसाठी ४४५ ते १,७४५ रुपये, तर आठ किलोमीटरनंतर २९ ते १४९ रुपये प्रतिकिलोमीटर दर लागू राहणार आहे.

Goa Taxi Fare
Goa Politics: 'मत चोरी'द्वारे जिंकण्याचा डाव, 1.27 लाख मतदार वगळले; सरदेसाईंचा भाजपवर आरोप

२५०० सीसी व त्यापुढील प्रीमियम कॅबसाठी पहिल्या तीन किलोमीटरसाठी १,००० रुपये आणि त्यानंतर १४९ रुपये प्रतिकिलोमीटर हा सर्वाधिक दर आहे.

पिवळ्या-काळ्या टॅक्सींसाठी नवे दर

९९८ सीसी ते १४९९ सीसी (हॅचबॅक व सेडान - उदा. वॅगन आर, स्विफ्ट, बलेनो, अमेझ, इटिओस)

पहिले ३ किमी : ३०० रुपये/-

३.१ ते ८ किमी : ४३० रुपये/-

८ किमी पुढील प्रवास : २६ रुपये प्रति किमी

१५०० सीसी ते २४९९ सीसी (एसयूव्ही - उदा. क्रेटा, इकोस्पोर्ट, जुनी इनोव्हा) :

पहिले ३ किमी : ४०० रुपये

३.१ ते ८ किमी : ५६० रुपये

८ किमी पुढील प्रवास : ३२ रुपये प्रति किमी

प्रीमियम एसयूव्ही/एमपीव्ही (उदा. इनोव्हा क्रिस्टा, ट्युसॉन) :

पहिले ३ किमी : ५०० रुपये

३.१ ते ८ किमी : ६६० रुपये

८ किमी पुढील प्रवास : ३२ रुपये प्रति किमी

अतिरिक्त आकार

प्रतीक्षा शुल्क : ५० रुपये प्रति तास किंवा दर १० मिनिटांच्या प्रतीक्षेसाठी ४ रुपये.

रात्रीचा प्रवास : रात्री ११ ते सकाळी ५ वा. या वेळेत सामान्य भाड्यावर ३५% अतिरिक्त आकार.

नगरपालिका हद्दीबाहेर एकतर्फी प्रवास : सामान्य भाड्यावर ५०% अतिरिक्त आकार.

टुरिस्ट टॅक्सी, मोटार कॅब

किनारपट्टी भाग व स्टार हॉटेल्सशी संलग्न असलेल्या टुरिस्ट टॅक्सींसाठी निश्चित केलेले सुधारित दर असे :

९९८ सीसी ते ११९९ सीसी (हॅचबॅक) :

पहिले ०-३ किमी ३००/-, ३.१-८ किमी ४४५/-, पुढील प्रवासासाठी २९ रुपये प्रति किमी.

१२०० सीसी ते १४९९ सीसी (हॅचबॅक/सेडान) :

पहिले ०-३ किमी ३००/-, ३.१-८ किमी ४८०/-, पुढील प्रवासासाठी ३६ रुपये प्रति किमी.

१५०० सीसी ते २४९९ सीसी (एसयूव्ही) :

पहिले ०-३ किमी ४००/-, ३.१-८ किमी ६४५/-, पुढील प्रवासासाठी ४९ रुपये प्रति किमी.

प्रीमियम एसयूव्ही/एमपीव्ही :

पहिले ०-३ किमी ५००/-, ३.१-८ किमी ७४३/-, पुढील प्रवासासाठी ४९ रुपये प्रति किमी.

२५०० सीसी व त्यापुढील प्रीमियम कॅब्स (मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी इ.) :

पहिले ०-३ किमी १,०००/-, ३.१-८ किमी १,७४५/-, पुढील प्रवासासाठी १४९ रुपये प्रति किमी.

अतिरिक्त आकार :

रात्रीचा प्रवास : रात्री ११ ते सकाळी ५ दरम्यान १०० रुपये प्रति तास आणि या कालावधीतील एकूण आकारावर ३५% अतिरिक्त अधिभार.

टोल, फेरी, कर व पार्किंग शुल्क : प्रवाशाकडून/ग्राहकाकडून वेगळे देय राहील.

Goa Taxi Fare
Goa Shack Policy: शॅक्‍स धोरणाला एका हंगामाची मुदतवाढ, नियमभंग केल्‍यास लाखोंचा दंड; सीसीटीव्ही बंधनकारक

रात्री ३५ टक्के अधिभार

दोन्ही प्रकारच्या टॅक्सींसाठी रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत निर्धारित भाड्यावर ३५ टक्के अधिभार आकारला जाणार आहे. टुरिस्ट टॅक्सींसाठी या कालावधीत १०० रुपये प्रतितास रात्रीचे शुल्कही लागू राहणार आहे. पिवळ्या-काळ्या टॅक्सींच्या नगरपालिका हद्दीबाहेरील एकतर्फी प्रवासासाठी सामान्य भाड्यावर ५० टक्के अतिरिक्त आकारणी केली जाणार आहे.

टॅक्सी चालकांवर लूट करीत असल्याचा जो आरोप होत होता, तो आता खोडला जाणार आहे. आम्ही जी दरवाढ ठरवली होती, ती सरकारने मान्य केली असून, ही ऐतिहासिक अधिसूचना आहे. सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत.

- सुदीप ताम्हणकर, नेते, गोवा राज्य टॅक्सी मालक चालक संघटना.

पार्किंग शुल्क ग्राहकाला

टोल, फेरी शुल्क, कर आणि पार्किंग शुल्क प्रवाशाला स्वतंत्रपणे द्यावे लागणार आहेत. टॅक्सीमध्ये सुधारित दरपत्रक प्रवाशांना स्पष्टपणे दिसेल, अशा ठिकाणी प्रदर्शित करणे परवानाधारकांना बंधनकारक करण्यात आले आहे.

पाच वर्षांनी सुधारणा

नव्या वाहन मॉडेलचा समावेश दरयादीत नसल्यास संबंधित परवानाधारकाला भाडे निश्चितीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागणार आहे. नव्या दररचनेमुळे पाच वर्षांनंतर टॅक्सी भाड्याला अधिकृत सुधारणा मिळाली असून, वाहनाच्या प्रकारानुसार आणि प्रवासाच्या अंतरानुसार भाडे निश्चित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com