Beer To Get Costlier in Goa Dainik Gomantak
गोवा

Liquor Rate Hike in Goa : बिअर दरवाढीचा गोवेकरांनाच बसणार फटका

बिअर पिणाऱ्यांमध्ये तब्बल 70 टक्के गोमंतकीय तर केवळ 25 ते 30 टक्केच पर्यटक असल्याचा दावा गोवा मद्यविक्रेते संघटनेने केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Liquor Rate Hike in Goa : सरकारने बिअर शुल्कदरात वाढ केल्याने सरकारी तिजोरीला वार्षिक 50 कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळेल आहे असा अंदाज आहे. परंतु या शुल्कदरवाढीचा फटका हा पर्यटकांना नाही तर थेट गोमंतकीय ग्राहकांनाच बसणार आहे. बिअर पिणाऱ्यांमध्ये 70 टक्के गोमंतकीय असून केवळ 25 ते 30 टक्केच पर्यटकांचा समावेश आहे. त्यामुळे पर्यटकांवर याचा परिणाम होणार नाही, असं मद्यविक्रेत्यांच्या संघटनेने स्पष्ट केलं आहे.

शुल्क वाढल्याने सामान्य बीयर किमान 15 रुपये प्रतिबाटली महाग होणार आहे. स्‍ट्राँग बीयर 20 ते 25 रुपये तर प्रिमियम 30 रुपये महाग होणार आहे. परंतु पर्यटकांना भारतीय उत्पादित विदेशी मद्य पसंतीचे असल्याने त्यांना जास्त फरक पडणार नाही. मात्र विदेशी मद्य आणि भारतीय उत्पादित विदेशी मद्य हे गोव्यात एकेकाळी स्वस्त होते. आता दक्षिण भारतातील राज्य वगळल्यास इतर राज्‍यांमध्ये गोव्याच्या तुलनेत मद्य स्वस्त दरात उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यातील मद्यविक्रेत्यांना जबर फटका बसला आहे, असे गोवा मद्यविक्रेते संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे मद्याचे दर गोव्यापेक्षा जास्त आहेत. राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, पश्‍चिम बंगाल सारख्या राज्‍यांमध्ये स्वस्त दरात मद्य मिळते. सरकारने विदेशी मद्य आणि भारतीय उत्पादित विदेशी मद्य शुल्क कमी करण्याची मागणी सध्या होऊ लागली आहे.

दुसरीकडे गोवा सरकारने इतरांच्या नावावर असलेले मद्यदुकान आणि बार परवाने भाडेपट्टीवर देण्याची तरतूद कायद्यात केली आहे. त्यासाठी अतिरिक्त 20 टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. परंतु ही तरतूद केवळ गोमंतकीयांसाठीच असून बिगरगोमंतकीयांना भाडेपट्टीवर देणाऱ्यांवर सरकारने कारवाई करून त्यांचे मद्यपरवाने रद्द करण्याची मागणी केली जात आहे. तसंच मद्यपरवाने भाडेपट्टीवर गोमंतकीयांनाच दिले जात आहेत. यासाठी तपास यंत्रणा उभारण्याची मागणीही केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT