Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Updates: राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

कर्नाटक प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या तीन ते चार दिवसात गोवा राज्यात पाऊस पडण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात 8 ते 11 मार्च या दरम्यान मेघगर्जनेसह सौम्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळच्या किनाऱ्यापासून कोकण किनाऱ्यापर्यंत त्याचप्रमाणे तटीय कर्नाटक प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या तीन ते चार दिवसात गोवा राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेद्वारे (IMD Goa) वर्तवली आहे.

पणजी वेधशाळेचे वैज्ञानिक राहुल एम यांनी सांगितले, सत्तरी सांगे आदी सीमेलगतच्या तालुक्यात आज बुधवारी पाऊस पडण्याची शक्यता असून तापमानात होणारी वाढ व हवेतल्या ओल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी मोकळ्या आभाळाखाली, खुल्या जागेत, शेतात तसेच उंच झाडाखाली आसरा घेणे टाळावे असे आवाहन गोवा हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली असून, तुरळक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसला आहे. बुधवार (ता. 9) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा इशाराही हवामान वेधशाळेनं दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून; मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता

Goa Housing Society: सोसायटीतील भांडणं, तक्रारी आणि वादांना मिळणार पूर्णविराम! सरकार स्थापन करणार 'सहारा' प्राधिकरण

Shreyas Iyer: 4 सामन्यात एकही विजय नाही... सरपंच साहेबांना यशाचा सूरच गवसेना! श्रेयस अय्यरच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

Goa Rainfall: राज्यात गेल्या 24 तासांत सरासरी 23.9 मिमी पावसाची नोंद, 30 इंचांचा टप्पा पार; चार दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

15 दिवस, 635 कॉल्स आणि दीड कोटींची मालमत्ता वाचवली! पावसाच्या प्रत्येक संकटात 'अग्निशमन दल' मदतीचा आधार

SCROLL FOR NEXT