Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: गोव्यात 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान हलक्या पावसाची शक्यता

बंगाल उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Rain Update: गोव्यात 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अशी माहिती गोवा हवामान खात्याने (IMD Goa) दिली आहे. गोव्यात मागील दोन दिवस कमी तापमानाची नोंद झाली आहे. बंगाल उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तसेच, तापमानात घट झाल्याने 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार आणि बुधवारी 22.5 ते 22.1 कमी तापमानाची नोंद झाली आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही ठिकाणी वादळी वारा ते हवामानात आद्रता निर्माण होण्याची शक्यता आहे. तमिळनाडू किनारपट्टी भागात हा बदल अधिक दिसून येत आहे. दरम्यान, गोव्यात 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 13 नोव्हेंबर रोजी पावासाची अधिक शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

ऑक्टोंबर 2022 महिन्यात सहा वर्षातील सर्वात कमी पाऊस

यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात मागील सहा वर्षातील सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. गोव्यात 3 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत दोन्ही जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून परतल्यानंतर झालेला पाऊस देखील मागील पाच वर्षातील सर्वात कमी पाऊस झाला आहे. पणजीत मंगळवारी नोंदवण्यात आलेले तापमान 33.6 अंश. से. हे सामान्य तापमानाच्या केवळ 0.4 अं.से. वरती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT