Lifestyle of freedom fighters
Lifestyle of freedom fighters Dainik Gomantak
गोवा

स्वातंत्र्यसैनिकांचा विरंगुळा होता ‘गुल्‍या फातराचा’

सुभाष महाले

काणकोण: काणकोणमधील स्वातंत्र्यसैनिक आडवाटेने कर्नाटकात जात असताना मार्ली येथील गुल्या फातर ओहळात असलेल्या कातळावर विरंगुळ्यासाठी गुल्या फातरांनी खेळत होते. या ओहळातील दोन कातळांवर अशा प्रकारची गुल्या फातर आहेत. या फातरांवर खोलगट भाग असून हे स्वातंत्र्यसैनिक Freedom Fighter आडवाटेने कर्नाटकात Karnataka जात असताना काही काळ या कातळावर विश्रांती घेऊन गुल्या फातर हा पारंपरिक खेळ खेळत होते.

(Lifestyle of freedom fighters)

मार्ली येथून कर्नाटकातील गोपशिट्टा, मायगिणी या भागात जाता येते. पोर्तुगीज Portuguese आमदानीत माजाळी व कारवार येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या छावण्या होत्या. गोव्याची पोळे येथील सीमा ओलांडून त्यांना कर्नाटकात जाणे शक्य नव्हते. त्यासाठी रानातील आडवाटेचा आश्रय घेऊन ते या छावण्यांमध्ये जात होते. मार्ली, तिर्वाळ येथील रहिवासी या स्वातंत्र्यसैनिकासाठी वाटाडे म्हणून काम करीत मार्ली येथील त्या काळच्या बुजुर्गांनी या कातळावर ते गुल्या फातरांचा खेळ खेळत असल्याचे या भागाचे पंच व पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर यांनी या भागाचा दौरा केल्यावेळी सांगितले.

पैंगीण पंचायतीच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीने मार्लीवाड्याच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या बेताळ व गुल्या फातर या स्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जैवविविधता समितीचे अध्यक्ष सुभाष महाले, सदस्य विराज पै खोत, गजानन बांदेकर, पैगीणचे सरपंच जगदीश गावकर उपस्थित होते.

शिलेला संबोधतात ‘बेताळ’

मार्लीवाड्यापासून या स्थळांकडे सुमारे दीड तास चालत जावे लागते. या ठिकाणाहून मार्लीवाड्याला पाणीपुरवठा करणारा ओहळ वाहत असून या ओहळाला गुल्या फातर ओहळ असे म्हणतात. याच ओहळाच्या पात्रात लिंगाच्या आकाराची एक शिला दगडाच्या गुहेत आहे. या शिळेवर निरंतर पाण्याची धार पडते. पुरातन काळापासून या शिलेला ‘बेताळ’ असे संबोधतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

पालकांना त्यांच्या मुलांची नावं राहुल गांधी किंवा लालू यादव ठेवण्यापासून कोण रोखू शकेल?: जाणून घ्या SC ने असे म्हटले

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT