ब्रह्मेशानंद, ब्रह्मानंद यांना पद्मश्री: गोव्याचाही गौरव

गोव्याचाही गौरव : जनरल बिपीन रावत, डॉ. बालाजी तांबे यांचा मरणोत्तर सन्मान
Padma Shri awards announced in Goa
Padma Shri awards announced in GoaDainik gomantak
Published on
Updated on

पणजी: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने नागरी क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांच्या नावांची घोषणा केली. यात गोव्यातील अाध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कुंडई येथील दत्त स्वामी पीठाचे आचार्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांना आणि 1983 ते 86 या काळात भारतीय फुटबॉल टीमचे नेतृत्व करणाऱ्या अर्जुन पुरस्कार प्राप्त ब्रह्मानंद शंखवाळकर यांना पद्मश्री पुरस्कार Padma Shri Award जाहीर झाले आहेत. तसेच दिवंगत आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

(Brahmeshananda, Brahmananda awarded the Padma Shri)

Padma Shri awards announced in Goa
Scam Mafia: टीएमसीचा हल्लाबोल; विश्वजित राणे 'घोटाळा माफिया'

कला, साहित्य आणि शिक्षण, प्रशासकीय सेवा, समाजसेवा, उद्योग आणि व्यापार, क्रीडा, विज्ञान आणि अभियांत्रिकी, औषधनिर्माण, पाककला, योग, अध्यात्म त्याचप्रमाणे कृषी, पशुपालन यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 128 मान्यवरांना यंदाचे पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. यामध्ये चार पद्मविभूषण विजेते, 17 पद्मभूषण विजेते तर 107 पद्मश्री विजेते आहेत. तर विधानसभा निवडणूक Assembly Election होत असलेल्या उत्तर प्रदेशातील 13, पंजाबमधील चार, उत्तराखंडमधील चार, मणिपूरमधील तीन पद्म सन्मानार्थींचा यादीत समावेश आहे. दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या नीरज चोप्राला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे नीरजला आजच अतिविशिष्ट सेवा पदकही जाहीर झाला आहे. परदेशात असलेल्या भारतीय वंशाच्या तसेच भारताच्या प्रगतीत योगदान देणाऱ्यांनाही पद्म देऊन सन्मानित करण्यात आले.पहिले सरसेनाध्यक्ष झालेले दिवंगत जनरल बिपीन रावत, गीताप्रेस गोरखपूरचे अध्यक्ष राहिलेले दिवंगत राधेश्याम खेमका, माजी राज्यपाल तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांना मरणोत्तर, तर प्रख्यात गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे. यासोबतच कोव्हिशिल्ड लशीचे उत्पादक सायरस पूनावाला यांना पद्मभूषण तर, विंचवाच्या दंशावर लस शोधणारे डॉ. हिंमतराव बावस्कर, प्रख्यात कलावंत सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.

Padma Shri awards announced in Goa
आणखी एका नेत्याचा भाजपला राजीनामा

कोरोना Covid-19 संसर्गाचा यशस्वी मुकाबला करण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या कोव्हिशिल्ड या लशीचे भारतीय उत्पादक सायरस पूनावाला, टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना, भारतीय बुद्धीमत्तेचा डंका जगभरात पोहोचविणारे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेले सत्या नाडेला, ‘गुगल’चे मुख्यकार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्यासह राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, पश्चिम बंगालचे दिवंगत मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते बुद्धदेव भट्टाचार्य, शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खान, आदी 107 जणांचा यंदाच्या पद्म सन्मानार्थींमध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातील डॉ. हिंमतराव बावस्कर, लावणी गायकीचा सोज्वळ चेहरा असलेल्या सुलोचना चव्हाण, डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे, चित्रपट संगितातील प्रसिद्ध नाव असलेला गायक सोनू निगम, अनिलकुमार राजवंशी, डॉ. भीमसेन सिंघल आणि डॉ. श्री गुरु बालाजी तांबे (मरणोत्तर) या सात जणांना पद्मश्री सन्मानाने गौरविले जाणार आहे.

शेकडो पीठांचे आचार्य

श्री दत्त पद्मनाभ गुरुपीठाचे प्रमुख तथा धर्मभूषण श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी हे लंडन येथील ब्रिटिश संसदेत शांतीचा राजदूत उपाधीने सन्मानित आहे. श्रीलंका येथे जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या महाबोधी सोसायटीकडून जागतिक शांतीदूत पुरस्कार, भारतातील शेकडो पीठांचे ब्रह्मेशानंदाचार्य आचार्य असून अखिल भारतीय संत समितीने धर्मभूषण या उपाधीने गौरविले. इटलीतील सूर्य चंद्र योग आश्रमाचे ते मानद अध्यक्ष असून द हिंदू धर्म आचार्य सभेचे प्रमुख आचार्य, जागतिक स्तरावरील बौद्ध व हिंदू यांना मार्गदर्शन करण्यासाठी हिंदू बौद्ध समन्वयक प्रधान आचार्य म्हणून कार्यरत आहेत.

भारताचे उत्कृष्ट गोलरक्षक

6 मार्च 1954 रोजी ताळगाव येथे जन्मलेल्या ब्रह्मानंद यांनी सुरवातीला पानवेल स्पोर्टस् क्लबमध्ये फुटबॉल खेळायला सुरवात केली. सलग 25 वर्ष ते विविध क्लब आणि टीमकडून फुटबॉल खेळले. 1983 ते 86 या काळात ते भारताच्या फुटबॉल टीमचे कर्णधार होते. गोलकीपर म्हणून देशभर प्रसिद्ध असणाऱ्या ब्रह्मानंद यांना 1997 साली अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. ते पानवेल स्पोर्टस् क्लबबरोबर साळगावकर स्पोर्टस् क्लब, चर्चिल ब्रदर्स स्पोर्टस् क्लब यांच्याकडूनही फुटबॉल खेळले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली दोन वेळेला गोव्याने संतोष ट्रॉफी जिंकली आहे.

सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. स्वामी समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचे आदर्शवत काम करत आहेत. शिवाय ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी सदोदित गोव्याचे नाव बुलंद केले. फुटबॉल आणि शंखवाळकर असे समीकरण रूढ होते. या दोघांचेही गोमंतकीय जनतेतर्फे अभिनंदन.

- डॉ.प्रमोद सावंत,‌ मुख्यमंत्री

अाध्यात्मिक क्षेत्रात ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींनी केलेले कार्य अतुलनीय आहे. ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी गोव्यासोबत देशाच्या फुटबॉलसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. या दोघांनाही मिळालेला पद्मश्री पुरस्कार इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com