Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: भावाच्या खूनप्रकरणी ज्ञानेश्‍वरला जन्मठेप

Goa Crime News: विनोदला कोठडीतील शिक्षा पुरेशी : कोर्ट

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: दारूच्या नशेत घरी येऊन भांडण करणाऱ्या विलास केरकर याचा त्याच्याच दोघा भावांनी दंडुक्याने प्रहार करून खून केला होता. या घटनेवेळी उपस्थित असलेल्या मयताची बहीण आणि भाची यांच्या साक्ष ग्राह्य धरून उत्तर गोवा सत्र न्यायालयाने भाऊ संशयित ज्ञानेश्‍वर केरकर आणि विनोद केरकर यांना दोषी ठरविले होते.

याप्रकऱणी आज न्यायालयाने ज्ञानेश्‍वरला जन्मठेप, तर आरोपी विनोदला त्याला कोठडीत दिलेली शिक्षा पुरेशी आहे, असे नमूद करून त्याची सुटका केली.

ही घटना आकय-म्हापसा येथे चार वर्षांपूर्वी घडली होती. न्यायालयाने संंशयित ज्ञानेश्‍वरला खून तर विनोदला सदोष मनुष्यवध प्रकरणी दोषी धरले. विलास हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन झिंगत घरी आला. नंतर तो आंघोळीसाठी प्रसाधनगृहात गेला. आंघोळीनंतर त्याने बहीण गीताकडे टॉवेल मागितला. या कारणावरून मोठा भाऊ विनोदला राग येऊन त्याने विलासला खडसावले. यावरून

त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. रागाच्या भरात विलासने मोठ्या भावाच्या कानफटीत लगावली. या प्रकाराने विनोद भडकला आणि त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. एकमेकांला मारहाण करत ते घराच्या अंगणात आले. हा प्रकार तेथे बसलेल्या ज्ञानेश्‍वरने पाहिला आणि तोही विलासवर धावून गेला.

याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी पंचनामा केला आणि विनोद, ज्ञानेश्‍वर या दोघांना अटक केली. आरोपपत्र सुनावणीवेळी न्यायालयाने विलासच्या खूनप्रकरणी दोन भावांच्या विरोधात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व सबळ पुराव्याच्या आधारावर आरोप सिद्ध होत असल्याचे आदेशात म्हटले आहे. आज त्यांच्या शिक्षेचा निवाडा सुनावण्यात आला.

‘त्या’ दोघींची साक्ष महत्त्वपूर्ण

तिघाही भावांमध्ये भांडण सुरू असताना तेथे त्यांची अविवाहित बहीण आणि मोठ्या बहिणीची मुलगी या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबान्या महत्त्वाच्या ठरल्या. दोघा भावांनी मद्यधुंद विलास याच्याशी भांडण करून त्याच्यावर दंडुक्याने प्रहार केला.

शेजाऱ्यांना दम

या दोघांनी विलासवर प्लास्टिक पाईप आणि लाकडी दंडुक्याने जोरदार प्रहार केले. विलासवर जोरदार हल्ला झाल्याने तो जखमी झाला. विलासच्या मदतीसाठी शेजारी धावून आले. मात्र, दोघा भावांनी त्याला मदत न करण्याची दमदाटी शेजाऱ्यांना केली. त्यामुळे त्याचा तेथेच मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT