Sunburn Festival Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: पुढील वर्षी ‘सनबर्न’ कसा होतो, तेच पाहू; काँग्रेसचा इशारा

दैनिक गोमन्तक

Sunburn Festival: राज्यात ‘सनबर्न’सारख्या निंदनीय कार्यक्रमांना गोव्याच्या भूमीत परवानगी देणे सरकारने थांबवावे. ज्या पद्धतीने वादग्रस्त सनबर्न फेस्टिव्हल गोव्यावर बळजबरीने लादला आहे, त्यावरून येथे कायद्याचे राज्य नसल्याचा स्पष्ट होते.

दुसऱ्या बाजूला राज्यात चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे पुढील वर्षी ‘सनबर्न’ महोत्सव कसा होतो ते पाहू, असा इशारा काँग्रेसने आज दिला.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते विजय भिके आणि प्रणव परब उपस्थित होते.

भिके म्हणाले, सनबर्न आयोजकांकडून हणजूण पंचायतीला भाड्यापोटी येणाऱ्या थकबाकीविषयी कोणी न्यायालयात गेले नसते तर ती रक्कम पंचायतीला मिळालीच नसती.

भिके म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही पहिल्याच दिवशी सनबर्नकडून ध्वनी नियमांचे उल्लंघन झाले. पोलिसांनी केवळ एक स्टेज बंद केले आणि इतर ठिकाणच्या कार्यक्रमाला परवानगी दिली. या कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी जे पास वितरण झाले, तोही एक गंभीर प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.

सनबर्न’चा राज्याला काय फायदा?

‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमाने राज्याला काय फायदा होतो, असा प्रश्न गोमंतकीयांकडून विचारला जात आहे. सनबर्न हा गोव्याचा ब्रॅण्ड या सरकारने तयार केला आहे. आम्ही ज्या तक्रारी पोलिसांत केल्या, त्याबाबत सरकार काय पावले उचलते, ते पाहू. सनबर्नसारख्या कार्यक्रमांत पोलिस यंत्रणा व्यस्त राहते आणि दुसरीकडे चोऱ्या वाढतात, असेही भिके यांनी नमूद केले.

महोत्सवात हिंदू देवतांचा अपमान

सनबर्न महोत्सवात शंकराच्या प्रतिमेसमोर कर्णकर्कश आवाजात हिडीस नृत्य सुरू होते, हा हिंदू देवतांचा अपमान आहे. त्याविरोधात पोलिस महासंचालक आणि उपअधीक्षकांकडे लेखी तक्रार नोंदविली असल्याचे विजय भिके यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT