Goa Sunburn Festival: वेळेतच ‘सनबर्न’चे पॅकअप; मात्र वाहतूक कोंडीचा त्रास

Goa Sunburn Festival: ड्रग्स सेवन वा विक्री प्रकरणाची एकही तक्रार नाही
Goa Sunburn Festival
Goa Sunburn FestivalDainik Gomantak

Goa Sunburn Festival: ध्वनी नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या पथकाने पहिल्याच दिवशी मुख्य मंचावरील कार्यक्रम बंद पाडून दणका दिल्यानंतर उर्वरित दोन दिवसांत आवाजाची मर्यादा ओलांडण्याचे धाडस ‘सनबर्न’ आयोजकांनी केले नाही. गेल्या 17 वर्षांत अशा कारवाईला सामोरे जावे लागले नसल्याने निर्ढावल्याचे वातावरण होते, त्याची हवा या कारवाईने काढली.

Goa Sunburn Festival
Illegal Sand Extraction: तानावडेंनीच बेकायदेशीर रेती व्यवसायावरील कारवाई रोखली

यंदाचा ‘सनबर्न’ महोत्सव अपवाद वगळता मर्यादेतच पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिली. मात्र, ‘सनबर्न’मध्ये अत्यवस्थ झालेल्या काहींना काल रात्री हलवण्यात आल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले असताना पोलिस यंत्रणेने यावर चुप्पी साधली होती.

चोरीस गेलेले पास आणि मोबाईल वगळता पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नाही.

Goa Sunburn Festival
Goa CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत केतन भाटीकरांच्या घरी!

त्या परिसरातून गुंजभरही अमली पदार्थ जप्त करण्यात यश आले नाही की, अमली पदार्थ सेवन केलेल्या व्यक्तीस पकडण्यात पोलिसांना यश आले.

सध्या किनारी भागात पार्ट्यांना ऊत आला असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा किनारी भागात जागोजागी पोलिस तैनात केले जातील, त्यामुळे कोंडी होणार नाही असा दावा केला होता. मात्र, तो नववर्ष लागण्यास २४ तास असतानाच फोल ठरल्याचे दिसून आले. शनिवारी रात्री सिकेरी, कळंगुट, बागा, हणजुणे, वागातोर, शिवोली, पान ११ वर

मोरजी, आश्वे, हरमल परिसरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळाली. यंदा देशी पर्यटक राज्यात मोठ्या प्रमाणात आले असून ते दुचाकी-चारचाकी वाहने भाड्याने घेऊन किनारी भागात दाखल झाल्याने अनेक ठिकाणी मुंगीच्या गतीने वाहतूक पुढे सरकत होती. किनारी भागात पार्ट्या सुरू असल्याचे लांबवरून समजत होते. रविवारी रात्री नववर्ष स्वागताच्या पार्ट्या रंगणार असल्या तरी शनिवारी रात्रीच तो माहोल किनारी भागात तयार झाला होता.

मालक फरार

शनिवारी सकाळी ॲश्‍ली यांनी हणजूण पोलिसांत लियोनी क्लबचे मालक ऑस्टीन यांनी केलेल्या मारहाणीची तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत पोलिस उपनिरीक्षक साहील वारंग यांनी लियोनी क्लबचा व्यवस्थापक विजय याला ताब्यात घेतले. क्लबचा मालक सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Goa Sunburn Festival
Amit Palekar: ‘सनबर्न’मध्ये महादेवाचा फोटो म्हणजे हिंदू धर्माचा अपमान

अधिकाऱ्यांनी ठेवले कानावर हात!

पोलिस अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी किनारी भागात ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा इन्कार केला. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी म्हणाले की, पावणे दहा वाजता आम्ही प्रत्यक्ष पार्ट्या सुरू आहेत, तेथे जाऊन १० वाजता संगीत बंद होईल, याची खबरदारी घेतो.

‘त्या’ क्लब मालकाची अरेरावी

यावेळी लियोनी क्लबच्या व्यवस्थापकाने नमते घेत पहाटेच्या सुमारास क्लबमधील संगीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तथापि, आपल्या मालकीच्या क्लबमधील संगीत ॲश्‍ली व त्याच्या मित्राने जबरदस्तीने बंद केल्याचा राग अनावर झाल्याने मालक ऑस्टीन याने सहकाऱ्यांसोबत जाऊन ॲश्‍ली फर्नांडिस यांचे घर गाठले आणि लोखंडी पाईपच्या साहाय्याने त्यांना मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com