Leopard was seen in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: तुयेत बिबट्याची दहशत; पाहा व्हिडिओ

गोवा(Goa) वनखात्याने या बिबट्याचा बंदोबस्त करावा.

दैनिक गोमन्तक

पेडणे : तुये परिसरात कुत्रे व गुरांना लक्ष्‍य करून बिबट्याने दहशत माजविली आहे. त्‍यामुळे स्‍थानिकांत घबराट पसरली आहे. वनखात्याने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी तुये, विर्नोडा, धारगळवासीयांकडून केली जात आहे. (Leopard was seen in the The area of Goa)

तुये गावातील कातुर्ली, सोणये पालये, बंदिरवाडा, झळूरे व मुरमुसे या वाड्यावरील परिसरात बिबट्याचा रात्रीच्यावेळी वावर असतो. रात्रीच्यावेळी लोकवस्तीत येऊन बिबट्याने कुत्र्यांना फस्त करण्याचे सत्र आरंभले आहे. यामुळे या भागातील कुत्र्यांची संख्या बरीच कमी झाली आहे. तर काही शेतकऱ्यांची गुरेही या बिबट्याने फस्त केली आहेत.

तीन बछड्यांचेही दर्शन

तुये, विर्नोडा व धारगळ अशा तीन गावांच्या सीमा एकत्र मिळतात या परिसरात ‘सटीची तळी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरात काहीवेळा या बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर काहीजणांनी रात्रीच्यावेळी बिबट्याच्या तीन बछड्यांना बघितल्‍याचे सांगितले. यामुळे सदर बिबट्या मादी असावी किंवा नर व मादी असून त्यांचे ते बछडे असावेत, असा लोकांचा अंदाज आहे. एक वर्षांपूर्वी तुये परिसरात रस्त्याच्या बाजूला बिबट्याचा एक बछडा मृतावस्थेत आढळला होता. वाहनाने ठोकर दिल्याने तो बछडा मृत झाला की, भीतीपोटी त्याला मारण्यात आले, अशी त्यावेळी गावात उलटसुलट चर्चा होती.

प्राण्यांचे अधिवास झाले नष्‍ट

‘साणाचो व्हाळ’ व ‘सुरंगींकडे’ अशा नावाने ओळखण्यात येणाऱ्या जंगल भागात वन्य प्राण्यांचे वास्तव्य असायाचे. पण, इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पासाठी रानटी जनावरांचा अधिवास नष्ट झाला. यापूर्वी पेडणे नगरपालिकेच्या कचरा प्रकल्पापासून जवळचा अधिवास त्यापूर्वी नष्ट झाल्याने प्राणी अन्न अथवा भक्षाचा शोध घेत थोडेफार शिल्लक राहिलेल्‍या रानात फिरत होते. रानात कुठे गुरे सापडली, तर त्याचा फडशा पाडतात. रानात काहीच न मिळाल्यावर लोकवस्तीत येऊन कुत्रे व पाडसांचा फडशा पाडतात, असे स्‍थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

Goa Opinion: ‘गोंयकारांनी’ घरांसाठी सरकारी दयेवर अवलंबून राहावे का?

Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

Ravi Naik: गोव्याच्या राजकारणाला वळण देण्याची हिकमत असलेला नेता 'रवी नाईक'

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

SCROLL FOR NEXT