मोकाट गुरांची वाढती संख्या व त्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन मुरगाव सडा (Murgaon) येथील 46 मोकाट गुरांची मये येथे गोमंतक गौसेवक महासंघ गोवा गौशाळेत (Gomantak Gausevak Mahasangh in Goa Gaushala) रवानगी करण्यात आली. याकामी स्थानिक नगरसेवक तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी (BJP Workers) मोलाची कामगिरी बजावली असून स्थानिक आमदार तथा मंत्री मिलिंद नाईक (Minister Milind Naik) यांनी त्यांचे कौतुक केले.अजून काही गुरे मोकाटच त्यांचीही रवानगी करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसात मुरगांव तालुक्यात आणी खास करुन सडा भागात गुरे दगावण्याच्या विचित्र घटना घडु लागल्या आणी त्यामुळे एक प्रकारचं भयावह वातावरण निर्माण झालं.लोग अनेक तर्कवितर्क करु लागले.कोणीतरी मुद्दामहुन विषप्रयोग केला असेल का असाही कयास लावला गेला. या संपुर्ण प्रकाराची कल्पना स्थानिक आमदार आणी नगरविकास मंत्री श्री मिलिंद नाईक यांना मिळताच त्यांनी लगेच या प्रकाराची शहानिशा करण्याची सुचना पोलिस खात्याला दिली.तसेच पशुसंवर्धन खात्याच्या अधीकाऱ्यांशी बोलुन जनावरांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आदेश देले.
एवढ्यावरच न थांबता इतर गुरांना असलेला धोका लक्षात घेऊन त्यांच आधी सरंक्षण करणे याला प्राथमिकता देऊन लगेच 'गोमंतक गौसेवक महासंघ-गोवा' या गोरक्षण कार्याशी संबधीत संस्थेशी संपर्क करुन मुरगांव भागात मोकाट फिरणाऱ्या भटक्या गुरांना पकडुन नेण्याची विनंती केली व या नेक कामी लागणारा सर्व खर्च स्वता: करण्याची उत्सुकता दाखवली.लगेच त्याच रात्री सिकेरी गोशाळा,मये येथील स्वंसेवक आपले वाहन घेऊन आले आणी त्यानी मोकाट गुरांना पकडण्याचे जिकिरीचे काम सुरु केले.
याकामी त्याना मदत करण्यासाठी मुरगांवातील नगरसेवक दामोदर नाईक,दयानंद नाईक,प्रजय मयेकर तसेच गोप्रेमी दामोदर कवठणकर,शशिकांत परब,संदिप मालवणकर हजर होते.तसेच मुरंगाव बिजेपी युवा मोर्चाचे कार्यकर्ते योगेश बांदेकर,रितीक कामत,प्रथमेश आमेरकर,वैभव बांदेकर,काशीनाथ बांदेकर,प्रसाद सातार्डेकर,प्रज्योत पार्सेकर,प्रितेश मयेकर आणी इतरानी भर पावसात भिजुन आणी रात्री 3-4 वाजेपर्यत जागुन त्यांना मदत केली.
एका रात्री 12 ते 15 अशा मिळुन आजपर्यत 46 गुरे या संस्थेच्या स्वयंसेवकानी पकडुन त्यांची रवानगी मये येथील गोशाळेमध्ये केली जेथे त्यांची योग्यप्रकारे देखभाल करण्यात येईल.अजुन बरीच गुरे मोकाट फिरत आहेत ज्यांना पकडुन नेण्याचे कार्य सुरुच राहिल.हे सर्व कार्य रात्री उशिरा आणी प्रसिध्दीची हाव न ठेवता करण्यात आल्यामुळे लोकांना याची बिल्कूल कल्पना आली नाही. तरी या निरागस जिवांचे प्राण वाचवण्याचे हे पवित्र कार्य केल्याबद्दल मंत्री श्री मिलिंद नाईक तसेच सर्व कार्यकर्त्यांचे,स्वयंसेवकांचे मनापासुन आभार व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.