Leopard spotted in Mardol Dainik Gomantak
गोवा

म्हार्दोळमध्ये बिबट्या घरात घुसला

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची कसरत, परिसरात घबराट

Narendra Tari

फोंडा : फोंड्याजवळ असलेल्या म्हार्दोळ परिसरात घराशेजारी असलेल्या खोपट्यामध्ये बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याचा भरवस्तीत वावर आढळल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा भाग सील करण्यात आला आहे. (Leopard spotted in Mardol News Updates)

बागा सीमेपाईण म्हार्दोळ येथील रामदास नाईक यांच्या घराला लागून असलेल्या लाकूड साठा केलेल्या खोपटीत बिबट्या (Leopard) सध्या बसून असल्याची माहिती आहे. सकाळी रामदास देवपूजा करण्यासाठी फुले काढण्यासाठी गेले असता हा बिबट्या खोपटीत निवांत पडलेला त्यांना दिसल्याने त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्यांनी लगेच परिसरातील इतरांना याबाबत माहिती दिली आणि पोलीस तसेच वन (Forest) खात्याला कळवण्यात आले.

सध्या म्हार्दोळमधील (Mhardol) हा परिसर सील करण्यात आला असून वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी जाळे, गुंगीचे इंजेक्शन यासारखे साहित्य घेऊन घटनास्थळी आले आहेत. दरम्यान या भागातील कुत्र्याची तीन पिल्ले नाहीशी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. कुत्र्याला पकडण्यासाठीच हा बिबट्या भर लोकवस्तीत आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कदाचित कुत्र्यांना खाऊन सुस्ती आल्याने किंवा सकाळी लोकांची लगबग पाहून बिबट्या खोपटीत असुरक्षेमुळे थांबला असावा असा अंदाजही बांधला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT