Dead leopard found at Tishem Borim Dainik Gomantak
गोवा

Dead leopard found at Tishem Borim: दोन बिबट्यांत झटापट; एकाने गमावला जीव

बोरीत घातपाताचा संशय : मृत बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

दैनिक गोमन्तक डिजिटल

leopard : पैंपाळ, तिशे-बोरी येथील श्री विठोबा मंदिराजवळ असलेल्या तलावाशेजारच्या झाडीत आज एक बिबटा मृतावस्थेत आढळून आला. याबाबत नागरिकांनी फोंडा वन खात्याला खबर देताच खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्‍थळी धाव घेऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतले. त्‍याला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.

पैंपाळच्या दुर्गम भागात असलेल्या नैसर्गिक तलावाचे पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी अनेक वन्यप्राणी येतात. हा बिबटा पाणी पिण्यासाठी आला असता कोणीतरी अज्ञाताने त्याच्यावर गोळी झाडली असावी किंवा दोन बिबटे आपापसात झगडल्यावर एक मृत झाला असावा, असा वन खात्याचा कयास आहे.

पंधरा दिवसांपूर्वी झाले होते दर्शन

शिरशिरे-बोरी येथील दुग्ध व्यावसायिक लक्ष्मण जोशी यांच्या गवताच्या शेतीत 15 दिवसांपूर्वी तीन बछड्यांसह बिबटा दृष्टीस पडला होता. वन खात्याने या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली, परंतु तो खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. त्यानंतर पाच ते सहा दिवसांनंतर शिरशिरे-बोरी येथील रहिवाशी व माजी सरपंच चंद्रू गावडे यांच्या बागायतीत दिवसाढवळ्या बिबट्या फिरताना आढळून आला होता.

लक्ष वैद्यकीय अहवालाकडे

वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याच्‍या मृत्‍यूचे कारण स्‍पष्‍ट होणार आहे. या वनक्षेत्रात काही शिकारी वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी फासे रचून ठेवतात. त्यामुळे आता वैद्यकीय अहवालाकडे लक्ष लागले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT