Leopard  Dainik Gomantak
गोवा

Quepem : कारवाई कधी? शिकाऱ्यांच्या फासात अडकून आणखी एक बिबट्या ठार

मृत बिबट्याची दात आणि नखे गायब झाल्यामुळे खळबळ

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem : दाबे (पाडी) केपेमध्ये शिकारीसाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अडकल्याने एका बिबट्याचा मृत्यु झाला आहे. हा पिंजरा रानडुकरांच्या शिकारीसाठी लावण्यात आला होता. शिकार करण्यासाठी लावलेल्या तारेच्या फासात अडकून बिबट्या मरण पावला. या मृत बिबट्याची दात आणि नखे गायब झाल्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान, वनविभाग या प्रकरणाचा तपास करत आहे.

हा प्रकार शनिवारी रात्री गावातील लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वन खात्याकडे चौकशी केली. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी तिथे जात पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. या पूर्वी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोपार्डे सत्तरी येथेही असाच एका बिबट्या शिकारी फासात अडकून मृत झाला होता.

या संबंधी वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मृत बिबट्या सापडल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र तो कुजण्याच्या अवस्थेत पोहोचला होता त्यामूळे त्याचे दात कुणी काढून नेले की ते कुजून खाली पडले याचा आम्हीं तपास करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.

शिकारी जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची अशीच एक घटना कोपार्डे येथे घडली होती. शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्यात अडकून बिबट्या मरण पावला होता. राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी घडलेल्या घटनेबद्दल सक्त कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. तसेच, वन कायदे अजून सक्त केले जातील असे वनमंत्री म्हणाले होते. वन परिसरात शिकारी जाळे लावल्याप्रकरणी चौकशी करुन दोषींवर योग्य कारवाई केली जाणार असल्याचे मंत्री राणे म्हणाले होते. मात्र वनमंत्र्यांच्या ईशाऱ्यानंतरही शिकारी जाळ्यात अडकून बिबट्याच्या मृत्युच्या घटना समोर येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT