Bike-riders-took-away-Mangalasutra
Bike-riders-took-away-MangalasutraDainik Gomantak

Porvorim : महिलांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या; राज्यात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

पर्वरीत अज्ञातांनी महिलेचे 2.99 लाखांचे मंगळसूत्र हिसकावून नेले
Published on

Porvorim : सध्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून दुचाकीवरून चोरटे चालत जाणाऱ्या महिलांना गाठून त्यांचे दागिने ओढण्याचा हिसकावून घेण्याचे प्रकार हल्ली वाढत आहेत. बार्देशमध्ये सोनसाखळी हिसकवण्याच्या प्रकाराला पुन्हा ऊत आला आहे. म्हापसा नंतर आता पर्वरीत अज्ञातांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार घडला आहे.

महिलेचे 2.99 लाखांचे मंगळसूत्र हिसकावून अज्ञात चोरांनी पळ काढला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. असाच एक मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार मांद्रेकरवाडा-डिचोली येथे काल घडला होता.

Bike-riders-took-away-Mangalasutra
Assembly Session Live Updates : म्हादईसाठी विरोधकांची 'गोवा बंद'ची हाक; आमदार वीरेश बोरकर यांचे वक्तव्य

हळदीकुंकूसाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्याची घटना काल कातरवाडा-डिचोली येथे घडली होती. मांद्रेकरवाडा-डिचोली येथील श्रीमती मांद्रेकर या सायंकाळी 'हळदीकुंकू'साठी कातरवाडा येथील आपल्या एका नातलगाकडे जात होत्या.

त्यांच्या पुतण्याने तिला दूकीवरून डिचोली- सारमानस रस्त्यावरील कातरवाडा थांब्यावर सोडून तो अन्य एका महिलेला आणण्यासाठी परत गेला.

दूसरी साथीदार महिलेची वाट पाहत मांद्रेकर या महिला रस्त्यावर थांबल्या असता, दुचाकीवरून आलेल्या युवकांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीसह पलायन केले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bike-riders-took-away-Mangalasutra
Save Mahadayi Virdi Protest: राजकारण नको, म्हादईसाठी एकत्र या; ही लढाई जिंकायलाच हवी

मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिला सध्या मोठ्या प्रमाणात दागदागिने, स्वर्ण अलंकार घालून फिरत असतात. या महिलांनी चोरांपासून सावधगिरी बाळगावी. संशयित व्यक्तीबद्दल तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com