Leopard attack in goa File Photo
गोवा

Leopard Attack: पेडण्यात बिबट्याचा वासरावर हल्ला; आतापर्यंत 12 पाळीव जनावरांचा फडशा

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

Kavya Powar

Leopard Attack in Goa: मागील काही महिन्यांमध्ये राज्यात बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माहितीनुसार, पेडण्यातही अशीच एक घटना समोर आली आहे.

वझरी येथील राजाराम नाईक यांच्या वासराचा गुरुवारी मध्यरात्री बिबट्याने फडशा पाडला. नाईक म्हणाले की, मी रात्री बारा वाजता गोठ्यात गेलो होतो. तोपर्यंत सर्वकाही ठीक होते. मात्र, सकाळी गोठ्यात गेलो असता, बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याचे दिसून आले.

यानंतर त्यांनी पेडणे वन खात्याला फोन करून याची माहिती दिली. बिबट्याने वासराचे पोट फाडून कोथळा बाहेर काढून फस्त केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून नाईक यांच्या सुमारे 12 पाळीव जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या समस्येवर काहीतरी तोडगा काढा, अशी मागणी त्यांनी वन खात्याकडे केली आहे.

दरम्यान, मुळगाव येथे लोकवस्तीत संचार करणारा बिबट्या 14 ऑगस्ट रोजी मध्यरात्री वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे मुळगावमधील जनता भयमुक्त झाली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने तालुक्यातील शिरगावसह डिंगणे-सुर्ल येथे बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले.

शिरगावातही एका बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवली आहे. शिरगाव पंचायत कार्यालयाच्या जुन्या इमारत परिसरात या बिबट्याचा संचार असल्याची माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: ड्रग्स प्रकरणात गोव्याचा 'बाबा' आणि 'मुन्ना' चर्चेत; हैदराबादेत अटक केलेल्या तस्कराच्या चौकशीत आंतरराज्य नेटवर्कचा गौप्यस्फोट

Pakistan Airstrike Afghanistan: पाकड्यांचा अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राइक! कुनार अन् पक्तिका प्रांतावर केला बॉम्बवर्षाव; अनेक जण गंभीर जखमी

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

SCROLL FOR NEXT