Leopard in Mulgao  Dainik Gomantak
गोवा

Leopard In Goa: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला

Leopard Attack In Goa:: कावरेतील थरार : युवक गंभीर जखमी; इतर वाहनांवरही केला होता हल्ल्याचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक

Leopard Attack In Goa: कावरे ते दानोळे या मुख्य रस्त्यावर बुधवारी (ता.6) सायंकाळी 7 वा.च्या दरम्यान मोहन वाडेकर कुर्पे तसेच त्यांचा भाऊ प्रदीप वाडेकर यांच्यावर चालत्या दुचाकीवर झडप घेऊन बिबट्याने प्राणघातक हल्ला केला.

यात मोहन वाडेकर गंभीर जखमी झाले. त्यांना केपे येथील आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई करीत आहेत. या घटनेने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

सांगे तालुक्यातील रिवण ग्रामपंचायत क्षेत्रातील कावरे ते दानोळे रस्त्यावर बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चालत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. यात मोहन वाडेकर हे गंभीर जखमी झाले.

त्यांच्यावर हल्ला करण्याच्या दहा मिनिटांपूर्वी नेत्रावळी येथील दोन युवकांवरही या बिबट्याने हल्ला केला होता; पण ते सुदैवाने बचावले, अशी माहिती मिळाली. तसेच त्या रस्त्याने चारचाकी बोलेरो जीप जाताना तिच्यावरही बिबट्याने हल्ला केला होता.

परिसरात भीतीचे वातावरण

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यापूर्वी एका गव्याने दुचाकीवर हल्ला केला होता.

स्थानिकांनी या घटनेची माहिती सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांना दिली असून त्यांनी यासंदर्भात तातडीने चौकशी करून संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. यापूर्वीही वाळपईत बिबट्याने एका शेतकऱ्याची म्हैस आणि रेडा मारल्याची घटना घडली होती. त्यामुळे घबराट पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT