Leopard terror in Canacona Dainik Gomantak
गोवा

काणकोणमध्ये भरवस्तीत बिबट्याचा हल्ला

बिबट्याने रात्री अचानक केलेल्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी

दैनिक गोमन्तक

काणकोण : काणकोणमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एकजण जखमी झाल्याने परिसरात घबराट पसरली. पेडे-लोलये येथील दिलीप राम सतरकर याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. भरवस्तीत बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिक दहशतीत असल्याचं चित्र आहे.

पेडे-लोलये येथील दिलीप राम सतरकर(वय 45) यांच्यावर गुरुवारी 24 मार्च रोजी रात्री बिबट्याने (Leopard) हल्ला केला. घराजवळ फिरत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. त्याला उपचारासाठी काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

पाळीव कुत्र्याला गुरुवारी रात्री फिरायला घराबाहेर घेऊन आले असता दिलीप यांच्यावर बिबट्याने हल्ला (Attack) केला. रस्त्यावर अचानक बिबट्याने हल्ला केल्याने काहीकाळ त्यांना धक्काच बसला. सध्या या भागात बिबट्याचा वावर वाढला असून वन विभागाने (Forest) बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी लोलये परिसरातील नागरिकांनी यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT