lemon Dainik Gomantak
गोवा

Lemon Rate In Goa : तप्त उन्हात लिंबू खातोय भाव; दरात वाढ

Lemon Rate In Goa : त्यामुळे फळे तसेच भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून उन्हापासून दिलासा देणारे लिंबू तर मोठ्या प्रमाणात भाव खात असून पणजी बाजारात मध्यम आकाराचा लिंबू ८ रुपयांना एक अशा दराने विकला जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Lemon Rate In Goa :

पणजी, राज्यात वाढलेल्या उष्म्यामुळे भाजी तसेच फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

त्यामुळे फळे तसेच भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून उन्हापासून दिलासा देणारे लिंबू तर मोठ्या प्रमाणात भाव खात असून पणजी बाजारात मध्यम आकाराचा लिंबू ८ रुपयांना एक अशा दराने विकला जात आहे.

कलिंगड, संत्री, आंबे, सफरचंद या फळांच्या दरात देखील वाढ झाली आहे. संत्री १५० रुपये, सफरचंद २०० ते २५० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. राज्यात आंब्याची आवक वाढल्याने काही प्रमाणात आंब्याच्या दरात घट झाली आहे. मानकुरात आंबा हजार ते बाराशे रुपये, हापूस सहाशे ते आठशे रुपये डझन दराने विकला जात आहे.

भाज्यांचे दर वाढले

राज्यात मागील दोन महिन्यांपासून सातत्याने भाज्यांच्या दरात वाढ होत आहे. फळभाज्या तसेच पालेभाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बाजाराच्या तुलनेत फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर स्वस्त दरात भाजी विक्री होत असल्याने आता अनेक नागरिक वाढत्या महागाईत फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर भाजी खरेदी करत आहेत.

खुल्या बाजारातील भाजीचे दर फलोत्पादनाचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

कांदा ४० २८

बटाटा ४० ३८

टोमॅटो ५० २७

गाजर ६० ४४

फ्लॉवर ४० २८

कोबी ४० २८

हिरवी मिरची ८० ६५

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohan Agashe: 'गोव्याची जनता कला उपासक'! अभिनेते मोहन आगाशेंनी केले महोत्सवाचे कौतुक; ‘कृतज्ञता सन्‍मान’बद्दल मानले आभार

Goa Politics: खरी कुजबुज; नेमके चाललेय तरी काय?

Mopa Parking Fee: '..आम्ही घर कसे चालवू'? टॅक्सीचालकांची आर्त हाक; मोपावरील शुल्कवाढीबद्दल तीव्र नाराजी

Goa CAG Report: गोवा राज्याला 65.83 कोटींचा फटका! ‘कॅग’ अहवालाने ठेवले भोंगळ कारभार, भ्रष्ट प्रवृत्तीवर बोट

Sound Limit: 'गोव्यात ध्वनिमर्यादा रात्री 11 वाजेपर्यंत वाढवा'! TTAG ची मागणी; नियोजनाअभावी ‘सनबर्न’ गेल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT