manikrao thakre Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: 'जायचंय त्यांनी खुशाल निघा, पक्ष एकावर चालत नाही'; गोवा काँग्रेस नेत्यांना ठाकरेंची तंबी

Goa Congress Latest News: बेशिस्तपणा करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Pramod Yadav

पणजी: गोवा काँग्रेसमध्ये बेशिस्तपणे वागणाऱ्या नेत्यांना प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी चांगलेच फैलावर घेतले. बेशिस्तपणे वागणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी तंबी ठाकरेंनी दिली आहे. तसेच, ज्यांना पक्ष सोडायाचाय त्यांनी खुशाल सोडावा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

गोवा महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिक्षा खलप यांचा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी प्रभारी माणिकराव ठाकरे बोलत होते. या सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा, प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर, गिरीश चोडणकर आणि इतर पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

"गोवा काँग्रेसमधील काही लोक माध्यमांमध्ये चुकीचा संदेश पसरवत आहेत. या लोकांना शिस्तीचा विसर असून, पक्षात बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. बेशिस्तपणा करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल", असा इशारा ठाकरे यांनी दिला. तसेच, "कोणाला पक्ष सोडायचा असेल तर खुशाल सोडावा, पक्ष कोणा एका व्यक्तीवर चालत नाही", असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

"नव्याने नियुक्त महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिक्षा खलप १५ दिवसांत पायउतार होणार अशा अफवा काहीजण मुद्दाम पसरवत आहेत. काँग्रेसला मागे खेचण्यात अंतर्गत लोक गुंतलेत. काँग्रेसची बदनामी आणि अफवा पसरवणाऱ्यांची नावे कळवावीत", असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

आप नेत्या आतिषी यांनी युतीबाबत केलेल्या वक्तव्यावर अंजली निंबाळकर यांनी भाष्य केले. "दिल्लीने विधानसभा निवडणुकीत तुम्हाला वास्तव दाखवले आहे. गोव्यात येऊन अशी वक्तव्य करण्यापूर्वी पहिल्यांदा दिल्ली वाचवा", अशी टीका निंबाळकर यांनी केली. तसेच, "आप आणि तृणमूल काँग्रेस केवळ मतं फोडण्याचे काम करतात. येत्या निवडणुकीत लोक काँग्रेसला साथ देतील", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT