POCSO Court Case: देईकरच्या जामीन अर्जावर सुनावणी; सीलबंद CCTV फुटेज पाहण्यास पॉक्सो न्यायालयाची परवानगी

Goa POCSO Court CCTV Footage Order: फुटेज तपासण्यास संशयितांनी घेतलेले आक्षेप न्यायालयाने फेटाळून लावले.
Goa POCSO Court CCTV Footage Order
POCSO Court CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेले गुन्हे शाखेचा निलंबित पोलिस निरीक्षक विकास देईकर आणि संशयित रजनी पालेकर यांच्या जामीन अर्जांवरील सुनावणीदरम्यान सीलबंद सीसीटीव्ही फुटेज उघडून पाहण्यास मेरशी येथील पॉक्सो न्यायालयाने परवानगी दिली आहे.

फुटेज तपासण्यास संशयितांनी घेतलेले आक्षेप न्यायालयाने फेटाळून लावले. पंच साक्षीदारांसमोर सीलबंद केलेले सीसीटीव्ही फुटेज तपास सुरू असताना उघडू नये किंवा पाहू नये, असा युक्तिवाद संशयितांच्या वकिलांनी केला होता. फुटेज कोणत्या विशिष्ट मुद्द्याच्या अनुषंगाने पाहायचे आहे, हे सरकारी पक्षाने स्पष्ट केलेले नाही.

Goa POCSO Court CCTV Footage Order
Goa Ujjwala Scheme: जनतेच्या सूचनांवर काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा; 'गोवा उज्ज्वला'च्या 70 कोटींवर सवाल

तसेच रेकॉर्डिंगची सत्यता तपासण्याची संधी मिळालेली नसल्याने ते पाहिल्यास जामीन अर्जांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे संशयितांच्या वकिलांचे म्हणणे होते. मात्र, जामीन अर्जांवर योग्य निवाडा करण्यासाठी हे फुटेज तपासणे आवश्यक असल्याचे सांगत सरकारी वकील, हस्तक्षेपकर्त्यांच्या वकिलांनी या आक्षेपांना विरोध केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.